चिंचवड :-भारतातील एक नामांकित आणि १९३ वर्षांची परंपरा असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ने चिंचवड येथील नवीन दालनाच्या भव्य उद्घाटनाने आपल्या यशात भर घातली आहे. चिंचवड, महाराष्ट्र येथे नव्याने सुरू झालेल्या या दालनाचे उद्घाटन बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ, कार्यकारी संचालक श्री. पराग गाडगीळ आणि ‘पीएनजी ज्वेलर्स’ परिवारातील अनेक लोक उपस्थित होते. या विस्ताराच्या माध्यमातून ब्रँड आपल्या अद्वितीय दागिन्यांना महाराष्ट्रातील अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने वाटचाल करत आहे.
६००० चौरस फुटांच्या या भव्य दालनात पारंपरिक तसेच आधुनिक आवडी लक्षात घेऊन सोने, हिरे, चांदी आणि प्लॅटिनमच्या अप्रतिम दागिन्यांचा संग्रह प्रदर्शित केला गेला आहे. उद्घाटनाच्या निमित्ताने सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर २०% पर्यंत सूट आणि हिरे जडित दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर १००% पर्यंत सूट देण्यात आली आहे.
‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘पीएनजी ज्वेलर्स’चे काम चिंचवडमधील ग्राहकांपर्यत पोहचवताना आम्हाला आनंद होत आहे. हे दालन म्हणजे आमच्या गुणवत्ता, विश्वास आणि नावीन्यतेच्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा सन्मान राखत, आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम सेवेसह उत्कृष्ट दागिने प्रदान करण्यास वचनबद्ध आहोत.
बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणाल्या, “मला ‘पीएनजी ज्वेलर्स’सोबत जोडले गेल्याचा आनंद आहे. हा ब्रँड भारतीय संस्कृतीला जपत जागतिक स्तरावर विस्तार करत आहे. दागिने हे केवळ अलंकार नसून ते भावना, परंपरा आणि सणवारांचे प्रतीक आहेत. ‘पीएनजी ज्वेलर्स’ हे नेहमीच विश्वासार्हता आणि आपल्या दागिन्यांच्या उत्कृष्ट कारागिरीसाठी प्रसिद्ध आहे आणि मला या सुंदर दालनाचे उद्घाटन करताना अतिशय आनंद होत आहे.”
चिंचवड हे ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि वेगाने विकसित होणारे शहर आहे, जे महाराष्ट्राच्या संस्कृती, उद्योग आणि परंपरेशी जोडलेले आहे. महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांना असलेली अनमोल ओळख जपत, ‘पीएनजी ज्वेलर्स’ने पिढ्यान्पिढ्या त्यांच्या शैलींचे जतन आणि आधुनिकीकरण केले आहे. आज ‘पीएनजी ज्वेलर्स’ भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या ब्रँडच्या विस्तारीकरणाला चालना देत आहे. चिंचवडमधील हे दालन तज्ज्ञ कारागिरी, हॉलमार्क प्रमाणित दागिने आणि खास वधूवरांसाठी दागिन्यांचे विविध संग्रह यांसह एक अद्वितीय खरेदीचा अनुभव देण्याचे आश्वासन देते.