बारामती (पुणे, महाराष्ट्र) — आज (२८ जानेवारी २०२६) सकाळी बारामतीकडे उतरत असतानाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे विमान भीषण अपघातात क्रॅश झाले, अशी दुःखद आणि ताजी माहिती प्राप्त झाली आहे. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
बारामती (पुणे) – महाराष्ट्राच्या राजकारणातून अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. लँडिंग दरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत एकूण ६ जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
अपघात नेमका कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत होते. बारामती विमानतळावर विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असतानाच नियंत्रण सुटल्याने विमानाचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की विमानाचे तुकडे पडल्याचे दृश्य काही ठिकाणी समोर आले आहे.
विमानात कोण होते?
विमानात अजित पवार यांच्यासह सुरक्षा कर्मचारी आणि इतर सहकारी असल्याची माहिती आहे. या अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
बचावकार्य आणि तपास
अपघातानंतर घटनास्थळी तात्काळ बचाव पथके आणि प्रशासन दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नसून नागरी उड्डयन विभागाकडून तपास सुरू असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात शोककळा
अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभरात शोककळा पसरली असून अनेक ठिकाणी समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.