जेष्ठ वकील ॲड. विजयराव तापकीर सरांचा भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्य तर्फे सन्मान

जेष्ठ वकील ॲड. विजयराव तापकीर सरांचा भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्य तर्फे सन्मान

पुणे (प्रतिनिधी): पुणे बार असोसिएशनचे जेष्ठ वकील आदरणीय ॲड. विजयराव तापकीर सर यांनी नुकतेच आपल्या नवीन ऑफिसचे उद्घाटन बी बिल्डिंग, तळमजला, शिवाजीनगर, पुणे येथे मोठ्या उत्साहात केले.

या विशेष प्रसंगी भारतीय पत्रकार संघ, लीगल विंग महाराष्ट्र राज्य तर्फे त्यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

वकिली क्षेत्रातील त्यांचा दीर्घ अनुभव आणि उत्कृष्ट कार्याबद्दल सर्वांनी गौरवोद्गार व्यक्त केले. नवीन ऑफिसमुळे त्यांच्या कार्याचा प्रवास आणखी यशस्वी व प्रेरणादायी ठरेल, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

या प्रसंगी ॲड. कैलास पठारे पाटील (अध्यक्ष, लीगल विंग AIJ महाराष्ट्र राज्य),
ॲड. पांडुरंग ढोरे पाटील (उपाध्यक्ष, लीगल विंग AIJ महाराष्ट्र राज्य),
ॲड. योगेश तुपे पाटील (महासचिव, लीगल विंग AIJ महाराष्ट्र राज्य),
ॲड. समीर बेलदरे पाटील (अध्यक्ष, पुणे जिल्हा लीगल विंग AIJ),
ॲड. सुरेश शिंदे (अध्यक्ष, अहमदनगर लीगल विंग AIJ),
ॲड. प्रविण गोरे (अध्यक्ष, सातारा जिल्हा लीगल विंग AIJ),
ॲड. मयूर माळी (सचिव, पुणे जिल्हा लीगल विंग AIJ),
तसेच ॲड. धैर्यशील सणस, ॲड. साई शेटे, ॲड. सम्राट जांभूळकर, ॲड. दर्शन गोऱ्हे, ॲड. ओंकार सोनवणे उपस्थित होते.

या वेळी आदरणीय ॲड. विजयराव तापकीर सरांनी त्यांच्या वकिली प्रवासातील अनुभव आणि मार्गदर्शनात्मक विचार मांडून सर्वांना प्रेरणा दिली.

 त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीयशस्वी कार्यप्रवासाासाठी भारतीय पत्रकार संघ, लीगल विंग महाराष्ट्र राज्य तर्फे हार्दिक शुभेच्छा.