केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह मित्रपक्षाचे नेते करणार मार्गदर्शन
पुणे : पुणे महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते, पदाधिकारी तसेस मनपा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये निवडणूकीचे उत्साहवर्धक वातावरण निर्माण करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्यावतीने 'संकल्प मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा संकल्प मेळावा २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वा. अहिल्या आश्रम मैदान, डॉ बाबासाहेब आवेडकर महाविद्यालय, नाना पेठ, पुणे येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, महिला शहराध्यक्ष हिमाली कांबळे, मोहन जगताप, बाबूराव घाडगे, भगवान गायकवाड, वसंत बनसोडे, डॉ. कपिल जगताप, रोहित कांबळे, निशांत सोनवणे आदि उपस्थित होते.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यात मित्र पक्षाचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि महायुतीतील सर्व आमदार या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे हे पक्षाचे प्रमुख नेते मेळाव्याकरीता उपस्थित राहणार आहेत,
मेळावा यशस्वी होण्यासाठी निरनिराळया समित्या गठीत केल्या आहेत पुणे शहरातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात व शाखामध्ये बैठका घेणे सुरु आहे, त्याचप्रमाणे अहिल्या आश्रम मैदान, डॉ. बाबासाहेव आंबेडकर महाविद्यालय, नानापेठ, पुणे येथील मैदानावर स्टेज, मंडप, पार्किंगची जय्यत तयारी चालू केली आहे.
निवडणूक प्रकिया अंतर्गत इच्छुक उमेव्दारांकरीता ११ ते १३ डिसेंबर २०२५ पर्यंत फॉर्म वाटप व स्विकृक्ति ठेवली आहे. मागील महापालिका निवडणूका भाजपा - आरपीआय महायुतीच्या वतीने लढविल्या गेल्या होत्या त्यामध्ये आरपीआयचे पाच नगरसेवक निवडून आले होते, महापालिकेत महायुतीच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाला वेगळा गट म्हणून मान्यता देण्यात आली होती त्यानुसार वेगळे ऑफिस देण्यात आले होते, पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तीन नगरसेवकांना उपमहापौर पदे देण्यात आली पक्षाला दोन प्रभाग समितीचे अध्यक्ष पदे व स्थायी कमिटी सदस्स पद मिळाले, महायुतीच्या सत्तेच्या माध्यमातून महापालिकेच्या प्रवेशव्दारावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थ पुतळा बसविण्यात आला, या सर्व सकारात्मक बाबींचा विचार करुन पुन्हा आगामी निवडणूक महायुतीच्या बरोबर लढण्याचे पक्षाने ठरविले आहे त्याकरीता भाजपाकडे २० जागांची मागणी केलेली आहे, या निवडणुकीमध्ये मध्ये रिपब्लिकन पक्षाचे दोन आकडी नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प या मेळाव्यात करण्यात येणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.