ॲड. भगवानराव साळुंखे यांची यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय सीडीसी चेअरमन पदी व ॲड. धैर्यशील सणस यांची दि. पुणे लॉयर्स कंझ्युमर को-ऑप. सोसायटी लि. तज्ञ संचालक पदी निवड — भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्यातर्फे दोन्ही मान्यवरांचा सन्मान
पुणे (प्रतिनिधी):
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) महाराष्ट्र राज्य सरचिटणीस, ज्येष्ठ विधिज्ञ व मार्गदर्शक आदरणीय ॲड. भगवानराव साळुंखे सर यांची अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे खजिनदार तसेच यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय सीडीसी चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल आणि भारतीय पत्रकार संघ लिगल विंग सदस्य ॲड. धैर्यशील सणस यांची दि. पुणे लॉयर्स कंझ्युमर को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. मध्ये नवनिर्वाचित तज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दल भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्यातर्फे शाल आणि सन्मानचिन्ह देऊन दोन्ही माननीयांचा सन्मान करण्यात आला.
हा सन्मान सोहळा एस. एस. पी. एम. एस., शिवाजीनगर, पुणे येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ विधिज्ञ मार्गदर्शक ॲड. विजयराव तापकीर सर होते. त्यांच्या हस्ते दोन्ही माननीयांना शाल व एआयजे लिगल विंग महाराष्ट्र राज्य सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी बोलताना ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. भगवानराव साळुंखे सर यांचा दीर्घ वकिली कारकिर्दीतील समाजाच्या न्यायप्राप्तीसाठी आणि न्यायव्यवस्थेच्या सुदृढीकरणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
त्यांच्या कार्यातून नवोदित वकिलांना प्रेरणा मिळत राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
नवनिर्वाचित तज्ञ संचालक ॲड. धैर्यशील सणस यांनी या वेळी बोलताना सांगितले की, “दि. पुणे लॉयर्स कंझ्युमर सोसायटीमध्ये तज्ञ संचालक पदाची जी संधी मिळाली आहे, तिचा उपयोग वकिल बांधवांच्या सेवा आणि सोयीसाठी जास्तीत जास्त प्रयत्नपूर्वक करणार आहे.”
तसेच त्यांनी सोसायटीतील सर्व संचालक मंडळ व वकील बांधवांचे आभार व्यक्त केले.
या सन्मान सोहळ्याला ज्येष्ठ विधिज्ञ मार्गदर्शक ॲड. भगवानराव सोळुंखे,भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲड. कैलास पठारे पाटील,
एआयजे लिगल विंग महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲड. पांडुरंग ढोरे पाटील,
महासचिव ॲड. योगेश तुपे पाटील,
अध्यक्ष अहिल्यानगर जिल्हा ॲड. सुरेश शिंदे,
अध्यक्ष सातारा जिल्हा ॲड. प्रविण गोरे,
तसेच ॲड. मयूर माळी (सचिव, पुणे जिल्हा एआयजे लिगल विंग) आणि संपूर्ण लिगल विंग टीम उपस्थित होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एआयजे लिगल विंग टीमने केले.