जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त दिल्ली येथे १० डिसेंबरला पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त दिल्ली येथे १० डिसेंबरला पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन

(पुणे प्रतिनिधी) जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त राष्ट्रीय अवार्ड सोहळा २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठन या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणारे व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी समाजसेवक, उद्योजक, व्यावसायिक, पत्रकार इ. यांना केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले, केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरी, केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून विविध क्षेत्रामधील व्यक्ती, सामाजिक कार्यात भरीव कार्य व योगदान देणारे समाजसेवक, उद्योजक, व्यावसायिक, प्रशासकीय कामात कर्तव्यदक्ष व उल्लेखनिय कामगिरी केलेले कार्यर व सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच प्रिंट व मीडियाचे पत्रकार तसेच शोध पत्रकार या माध्यमातून समाजाला आपल्या लेखणीतून व कार्यपद्धतीमधून आरसा दाखवणाऱ्या पत्रकारांना या कार्यक्रमामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन मध्ये दि. 10 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले असल्याची माहीती मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठन या राष्ट्रीय संघटनेचे  राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतीश केदारी यांनी दिली आहे.