महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक व जनरल कामगार संघ (रजि)कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक व जनरल कामगार संघ (रजि)कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन
पिंपरी चिंचवड – महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार संघ (रजि)कार्यालयाचे काल मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांच्या शुभहस्ते या कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.
 
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  चिंचवड विधान सभेचे  आमदार शंकर जगताप आणि आमदार अमित गोरखे उपस्थित होते. तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, कामगार नेते संजय बापू निकम, पुणे जिल्ह्याचे आझमभाई खान, यांची उपस्थिती लाभली तर पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विनोद पासुटेकर सेक्रेटरी चंद्रकांत बुचकुरे यांनी परिश्रम घेतले 
 
यावेळी बोलताना उपसभापती अण्णा बनसोडे म्हणाले, “मी नेहमीच कामगारांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. चांगल्या कामासाठी माझा पाठिंबा सदैव असेल. संघटनेच्या आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी मी ठामपणे सोबत उभा राहणार आहे.”
 
आमदार शंकर जगताप यांनी आश्वासन दिले की, “माथाडी कामगार संघटनेसाठी जे काही मदत लागेल ती मी माझ्यातर्फे नक्कीच करणार.”
 
तर आमदार अमित गोरखे यांनी संघटनेच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत म्हटले की, “कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे नेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
कामगारांना कुठल्याही समस्या आल्या तर प्लॉट नं. ८३, डी-३ ब्लॉक, एम.आय.डी.सी., ए.क्यु. अंसारी रोड, आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाजवळ चिंचवड, पुणे - ४११०१९. या ठिकाणी तक्रार करू शकता असे आवाहन संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष आझम खान यांनी केले 
इंदास पाटील यांनी माथाडी कामगारांना मार्गदर्शन व्यक्त केले
यावेळी ज्येष्ठ कामगार नेते बाळासाहेब शिंदे यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी रज्जाक शेख,विशाल काळभोर, प्रसाद शेट्टी,झाकीर भाई अन्सारी, हनीफ भाई मुजावर, आदम बिग, अब्बास चाऊस, निलेश निकाळजे, लक्ष्मण नागटिळक, अजय थोरात, आदी जण उपस्थित होते.
 
या कार्यक्रमाला उपस्थित कामगारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत नेत्यांचे स्वागत केले.