पनवेल महानगरपालिकेच्या वतीने अभिजात मराठी भाषा संवर्धन सप्ताह अंतर्गत के.एल.ई महाविद्यालयात व्याख्यान व प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने अभिजात मराठी भाषा संवर्धन सप्ताह अंतर्गत के.एल.ई  महाविद्यालयात  व्याख्यान व प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन
पनवेल,दि 04 :  अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताह राज्यात दिनांक 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या दरम्यान साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहांतर्गत महापालिकेच्या वतीने आज  दिनांक 4ऑक्टोबर रोजी  के.एल.ई. सोसायटी सायन्स अँड  कॉमर्स कॉलेज कळंबोली येथे 'अभिजात मराठी भाषा संवर्धन' या विषयावर व्याख्यान व प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 
 
अभिजात मराठी भाषा संवर्धन सप्ताह अंतर्गत महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने आज के.एल.ई. सोसायटी सायन्स अँड  कॉमर्स कॉलेज कळंबोली येथे 'अभिजात मराठी भाषा संवर्धन' या विषयावर व्याख्यान व प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सुमारे 96 विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.यावेळी
प्राचार्य डॉ. विजय मेंडुलकर, प्रकल्प अधिकारी अरविंद साबळे आणि शितल घरवे उपस्थित होते.
 
 
‘अभिजात मराठी भाषा’ निबंध स्पर्धा
 
अभिजात मराठी भाषा सप्ताह अंतर्गत महापालिका मनपा हद्दीतील सर्व नागरिकांसाठी ‘अभिजात मराठी भाषा’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेकरिता स्वलिखित हस्ताक्षरामध्ये स्पर्धकांनी 7 ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपले निबंध पालिकेच्या लोकनेते दि.बा. पाटील शाळेचे मुख्याध्यापक वाल्मिक राठोड यांच्याकडे सुपूर्त करावे असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
 
याच बरोबर ‘मराठी भाषाचे सौंदर्य आणि नवी दिशा’ या विषयावरती प्रा.डॉ.वि.ल.धारूरकर, छत्रपती संभाजीनगर  यांच्या व्याख्यानाचे दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय अध्यापक महाविद्यालय व दुपारी 3.00 वाजता आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध शाळांमध्ये प्रश्नमंजूषा, व्याख्यान, प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घेण्याचे व मराठी भाषेच्या संवर्धनाच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.