मराठमोळा संगीतकार सागर पाटिल याने रचला इतिहास, दुबईत प्रदर्शित केले “मॅंगो अॅंथम” हे मराठी गीत
दुबई, UAE :दुबईस्थित मराठमोळा संगीतकार आणि सांस्कृतिक उद्योजक सागर पाटील (BeatXX) यांनी त्यांचे नवीन गाणे “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” नुकतेच दुबईत प्रदर्शित केले आहे. भारतीय संस्कृती, आणि संगीताचा उत्साहपूर्ण संगम असलेले हे गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. ‘द मॅंगो अँथम’ हे केवळ एक मनोरंजनात्मक गाणे नसून भारतीय संस्कृतीशी असलेली भावनिक नाळ आहे. विशेषतः मराठी संस्कृतीचा अभिमान आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या ओळखीचे प्रतीक म्हणूनही पाहिले जात आहे. आकर्षक संगीत, लक्षवेधी व्हिज्युअल्स आणि सहज गुणगुणता येईल अशी रचना यामुळे हे गाणे तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे.
संस्कृती जपणारा कलाकार सागर पाटील हे केवळ संगीत क्षेत्रापुरते मर्यादित नसून UAE मधील मराठी आणि भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. ते प्रथा.UAE या सांस्कृतिक उपक्रमाचे संस्थापक असून या माध्यमातून त्यांनी विविध पारंपरिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यशाळांचे यशस्वी आयोजन केले आहे. गणेशोत्सव, शिवजयंती, दहीहंडी, दुर्ग मोहिम यांसारख्या उपक्रमांद्वारे UAE मधील नव्या पिढीला भारतीय संस्कृती प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक मराठी आणि भारतीय कुटुंबांमध्ये सांस्कृतिक जडणघडण अधिक दृढ झाली आहे. मध्यपूर्वेत ढोल-ताशाचा जागतिक ठसा सागर पाटील यांनी मध्यपूर्वेत पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीच्या प्रसारातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दुबईतील विविध मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर त्यांनी महाराष्ट्रीयन तालवाद्यांची ओळख प्रभावीपणे सादर केले
https://youtu.be/XuzydHilIaY?si=dXwFi-OqakNfbc36