झुंजार आंबेडकरी नेतृत्व काळाच्या पडद्याआड; प्रवीण निकाळजे यांचे निधन
KS News सोलापूर प्रतिनिधी संदेश कांबळे
सोलापूर प्रतिनिधी : काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू नेते प्रवीण निकाळजे यांचे आज दि. २३ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरी चळवळीतील एक अभ्यासू, लढवय्या व जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने झटणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. आपल्या कार्यातून त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
प्रवीण निकाळजे यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्यकाळात सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत अनेक लढ्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, अभ्यासू वृत्ती आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीमुळे त्यांना मोठा जनाधार लाभला होता.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, मित्रपरिवार आणि असंख्य कार्यकर्ते असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.