अनुसूचित जाती उपवर्गीकरण विषयावर सोलापुरात २४ मे रोजी प्रमुखांची बैठक
सोलापूर, दि. २२ मे २०२६ : महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेल्या अनुसूचित जाती उपवर्गीकरण या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी तसेच सद्य परिस्थितीत भूमिका स्पष्ट करण्यासाठी अनुसूचित जातीतील ५९ जातींच्या समाज बांधवांची प्रमुख बैठक आयोजित करण्यात आली आहे.
संविधानप्रेमी व आंबेडकरी विचारांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व अनुयायांना या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भावी पिढीचे भविष्य लक्षात घेऊन सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन पत्रकातून करण्यात आले आहे.
ही बैठक रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर, पार्क चौक, सोलापूर येथे होणार आहे.
या बैठकीचे निमंत्रक श्री. गायकवाड असून विविध सामाजिक संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
KS NEWS सोलापूर प्रतिनिधी सांदेश कांबळे