कैलास बोराडे ला न्याय देऊन आरोपींवर कठोर कारवाई करा... वंचित बहुजन आघाडीची मागणी

कैलास बोराडे ला न्याय देऊन आरोपींवर कठोर कारवाई करा... वंचित बहुजन आघाडीची मागणी

औरंगाबाद : दिनांक 07 मार्च 2025 रोजी, क्रांतीचौक औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष योगेश गुलाबराव बन यांच्या नेतृत्वात निदर्शने आंदोलन करण्यात आले. जालना जिल्ह्यात अलीकडे मागासवर्गीय भटक्या - विमुक्त तसेच ओबीसी समाजावर अन्याय अत्याचार वाढले आहेत. सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत, कायदा हातात घेणाऱ्यांना कायद्याचे भय उरलेले नाही. पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सुरक्षित वातावरण राहिलेले नाही. दिवसेंदिवस वेगवेगळ्या मध्ये अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे.
      भोकरदन तालुक्यातील आण्वा येथील कैलास बोराडे या मेंढपाळ समाजाच्या तरुणास महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महादेव मंदिरात गेल्याच्या कारणावरून लोखंडी सळई गरम करून त्याच्या शरीरावर चटके दिले तसेच क्रूरपणे छळ करून मारहाण करण्यात आली. सदरील घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून अतिशय निंदणी आहे. 
     कैलास बोराडे या तरुणाचा क्रूरपणे झालेला छळ हा महाराष्ट्राला हादरून टाकणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांती चौक छत्रपती संभाजी नगर येथे तीव्र निषेध आंदोलन करून सदरील प्रकरण मधील आरोपीवर मोका अंतर्गत ( महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) कार्यवाही व्हावी, प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, व सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात म्हणजे जलद न्यायालयात चालवावे व आरोपींना कडक शासन व्हावे यासाठी निदर्शने आंदोलनाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी छत्रपती संभाजी नगर शहर जिल्हा कमिटी मार्फत आंदोलन करण्यात आले. 


यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तय्यब जफर, मराठवाडा कार्यक्रम प्रमुख जितेंद्र शिरसाट, औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष योगेश गुलाबराव बन, औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, शहराध्यक्ष पंकज बनसोडे, महिला शहराध्यक्ष वंदना जाधव,  युवा शहराध्यक्ष संदीप जाधव,  जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, उपाध्यक्ष रूपचंद गाडेकर, दिनेश साळवे, पुरुषोत्तम दाभाडे, रामदास वाघमारे, सुभाष कांबळे, खुलताबाद तालुकाध्यक्ष मुक्तार सय्यद, वैजापूर तालुकाध्यक्ष सखाराम शिंगारे, वैजापूर युवा तालुकाध्यक्ष अमोल दिवे, वैजापूर तालुका महासचिव मनोज पठारे, राहुल साळवे, गंगापूर तालुका महासचिव बाबासाहेब दुशिंग,  सुशील कुमार शिराळे, गणेश खोतकर, शहर उपाध्यक्ष मेघानंद जाधव, एस पी मगरे, महिला जिल्हा सहसचिव सुलोचनाताई साबळे, जयाताई गजभिये, कैलास गंगावणे, रवी रत्नपारखे, नितीन गिरी, नितीन भुईगळ, सागर दापोडकर, सिद्धार्थ बनकर, अशोक खिल्लारे, प्रकाश सोनवणे, ऍड डी. व्ही. खिल्लारे, योगेश साबळे, कैलास गिरी, अतुल गिरी, अंकुशभैय्या पठारे, ऋषिकेश कांबळे, संकेत कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...