एलएलबी (पाच वर्ष) च्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरवात

एलएलबी (पाच वर्ष) च्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरवात

दि. ९ जुलै पर्यंत चालणार प्रक्रिया

पंढरपूरः ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित स्वेरी लॉ कॉलेजमध्ये बीए एलएलबी (पाच वर्षे) च्या कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेस शुक्रवार, दि.१९ जून २०२६ पासून सुरूवात झाली असून ही प्रक्रिया गुरुवार दि. ९ जुलै २०२६ पर्यंत चालणार आहे. या प्रक्रियेला विद्यार्थी व पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.’ अशी माहिती गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुटचे संस्थापक डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. 

सन २०२६-२७ करीता पाच वर्ष मर्यादा असलेल्या बीए एलएलबी प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याकरिता स्वेरी मध्ये सुविधा उपलब्ध आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी लॉ च्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणारी अडचण व शंका याबाबत ‘मार्गदर्शन सुविधा केंद्र’ सुरु केले आहे. सदरच्या रजिस्ट्रेशनची प्रकिया दि. १९ जून २०२६ पासून ते दि. ९ जुलै २०२६ पर्यंत चालणार आहे. या पाच वर्ष कालावधी असलेल्या बीए एलएलबीच्या प्रवेशासाठी कोणत्याही शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पात्र आहेत. रजिस्ट्रेशन प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. स्वेरीचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी उच्चशिक्षित प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच वर्ष कालावधी असलेल्या बीए एलएलबी प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. उत्तम अनुसे (मोबा.-९१६८६५५३६५) व प्रा. विक्रम पाटील (मोबा.नंबर–९०९६०१६६२५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.