मा.सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

मा.सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

KS News सोलापूर प्रतिनिधी संदेश कांबळे 

सोलापूर, दि. २१ जून : मा. सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी तसेच निरोगी जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अधीक्षक श्री. रामचंद्र कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात श्री. रियाज मुल्ला सर यांनी योगाचे महत्त्व व आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

यानंतर विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम व ध्यान यांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत योगासने सादर केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभम वांजरे यांनी विशेष सहकार्य केले. योगाच्या माध्यमातून निरोगी शरीर, शांत मन आणि सुदृढ व्यक्तिमत्त्व घडविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.