कांदिवलीत शिवसेना शाखा क्रमांक २१ चे कार्यालय प्रमुख मयूर सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
(मुंबई विशेष प्रतिनिधी सौ रूपाली बैसाणे): कांदिवली येथील बंदरपखाडी परिसरातील शिवसेना शाखा क्रमांक २१ चे कार्यालय प्रमुख आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे मयूर सावंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने परिसरातील महिला, शिवसैनिक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी उपस्थित राहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
मयूर सावंत हे परिसरातील महिला सखी वर्गासह सर्वसामान्य नागरिक आणि शिवसैनिकांमध्ये आपुलकीचे, विश्वासाचे आणि मदतीला धावून जाणारे नेतृत्व म्हणून परिचित आहेत. सामाजिक कार्य असो किंवा नागरिकांची कोणतीही अडचण, प्रत्येक वेळी मदतीसाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळेच परिसरात त्यांना प्रेमाने ‘मयूर दादा’ म्हणून संबोधले जाते.
रक्ताचे नाते नसतानाही विश्वास, जिव्हाळा आणि आपुलकीच्या बळावर माणसांशी नाते जोडण्याची हातोटी मयूर सावंत यांच्यात आहे. महिला असोत वा पुरुष, ज्येष्ठ नागरिक असोत वा तरुण शिवसैनिक, सर्वांशी प्रेमाने संवाद साधत ते सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात सक्रिय असतात. त्यांच्या या स्वभावामुळे परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष जिव्हाळा आणि विश्वास असल्याचे दिसून येते.
वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शुभेच्छा कार्यक्रमात परिसरातील महिला, चारकोप विधानसभा प्रमुख सुषमा कदम.श्याम मोरे उपविभाग प्रमुख
,रवि मर्ये शाखा प्रमुख.महिला शाखा संघटक सिध्दी संसारे.शाखा समन्वयक प्राजक्ता कातुर्डे शिवसैनिक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांनी मयूर सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी आणि कार्यकर्त्यांशी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध यांमुळे ‘मयूर दादा’ यांचा वाढदिवस परिसरातील नागरिकांसाठी आनंदाचा आणि आपुलकीचा सोहळा ठरला.