इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
भारतीय संस्कृतीची जगाला सर्वात महत्वाची देणगी म्हणजे योग. शाररीक आणि मानसिक आरोग्याला पूरक अशी व्यायाम पद्धती असाही त्याचा लौकीक आहे. योगासने करुन आपण आपले शरीर आणि मन निरोगी राखू शकतो. त्यामुळेच योगाचा अधिकाधिक प्रसार व्हावा
या हेतूने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इचलकरंजी , पतंजली योग समिती इचलकरंजी यांच्या सहकार्याने आज रविवार दि.२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन राजाराम स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी आमदार सुरेश हाळवणकर, उप महापौर अनिल डाळ्या,अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन करून करण्यात आला.
यामध्ये कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद, इचलकरंजीचे प्रशिक्षक सुहास पवळे तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनायक मुरदुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योग, प्राणायाम, ध्यान इत्यादी बाबींची प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी जागतिक योगासन चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेत्या वृंदा भुतडा आणि निवेश पाटील या इचलकरंजी शहरामधील खेळाडुंचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
योग,प्राणायाम, ध्यान यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते त्याच बरोबर निरोगी आयुष्यासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने महानगरपालिकेच्या आवाहना नुसार शहरवासीयांनी त्याच बरोबरच महानगरपालिका रा.छ. शाहू हायस्कूल, डि.के.ए.एस.सी. महाविद्यालय , गर्ल्स हायस्कूल, बापुजी साळुंखे हायस्कूल, मुसळे हायस्कूल, डि.के.टी.ई.नारायण मळा, महानगरपालिका रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा, उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी राजाराम स्टेडियम येथे मोठ्या संख्येने सहभाग घेतला.