शालेय शिक्षण दर्जेदार पद्धतीने देण्यासह विविध विषयांवर महत्त्वपूर्व चर्चा

पुणे, दि.२०: (जिमाका वृत्तसेवा): शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचा समारोप करण्यात आला. या परिषदेस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासह राज्यातील शिक्षण विभाग, पुणे महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.
शालेय शिक्षण परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या सुरु असलेल्या विविध योजना, उपक्रमांचा आढावा घेतला घेवून मार्गदर्शन केले.
आयुक्त शिक्षण सचिन्द्र प्रताप सिंह यांनी इन्स्पायर मानक, एक पेड माँ के नाम २.०, हरित महाराष्ट्र, - समृद्ध महाराष्ट्र उपक्रम , इको क्लब फॉर मिशन लाईफ, स्वच्छ आणि हरित विद्यालय मुल्यांकन, स्वच्छ पंधरवाडा- स्वच्छता हीच सेवा उपक्रम, तंबाखू मुक्त अभियान, आधार वैध व आधार नोंदणी कामकाज, अपार जनरेशन, संच मान्यता, अतिरिक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समायोजन, शाळा व संस्था मॅपिंग या विषयांचा समावेश होता. सदर विषयांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस तसेच शासकीय संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रमाणपत्र परीक्षाविषयी मार्गदर्शन केले.
शिक्षण संचालनालयांच्या शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी उल्हास नवभारत योजना, एनएमएमएस, राजीव गांधी अपघात योजना, मराठी भाषा फाउंडेशन योजना २.० विषयी उपस्थितांना माहिती दिली.
न्यायालयीन प्रकरणे व विद्यार्थी सुरक्षाविषयी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन,
यांनी मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात...
दुपारच्या सत्रात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग उपसचिव समीर सावंत यांनी व्हिजन डॉक्युमेंट व महाराष्ट्र व्हिजन@२०४७ याविषयावर मार्गदर्शन केल.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण सहसंचालक रामकांत काठमोरे,
यांनी शाळा प्रवेशोत्सव, पी.एम.पोषण योजना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना भौतिक सुविधांची उपलब्धता, शालेय आरोग्य तपासणी, इ.५ वी व इ. ८ वी वर्ग जोडणे, विशेष शिक्षक समायोजन प्रक्रिया, शालेय परसबाग, अन्न बिघडू नये यासाठी नियमावली, शैक्षणिक पर्यटन, सहशिक्षण-एकाच परिसरातील शाळांचे समायोजन, शैक्षणिक कामकाज नियोजन, आणि शाळांना संगणक पुरवणे या विषयांवर मार्गदर्शन केले.
यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी इयत्ता १० वी व १२ वी परीक्षांविषयी ऑनलाईन कामकाज आणि परीक्षांसंबंधीत ऑनलाईन सुविधांबाबत माहिती दिली.
त्यानंतर सत्रात क्षेत्रीय स्तरावरील उल्लेखनीय उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये खान अॅकेडमीच्या वतीने डॉ.जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाचे शिक्षकांसाठी गणित, विज्ञान व अन्य विषयांबाबत मार्गदर्शन केले.
ज्ञानप्रकाश या सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवत्तापूर्ण आणि प्रभावी होण्यासाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद, शाळा व्यवस्थापन समिती, शैक्षणिक गरमसभा व पालक बैठक या उपक्रमांबाबत माहिती दिली. लेंड अ हॅन्ड इंडिया संस्थेच्यावतीने नवीन शैक्षणिक धोरण २०२०, एनसीएफ २०२३ आणि एससीएफ २०२४ अनुसार शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण याविषयावर सादरीकरण करून उपस्थितांना माहिती दिली.
यासाठी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त शिक्षण सचिन्द्र प्रताप सिंह, राज्य प्रकल्प संचालक संजय यादव ,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार , महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण संचालक, सहसंचालक, उपसंचालक, प्राचार्य डायट व शिक्षण विभागातील अधिकारी आदी उपस्थित होते.
दोन दिवसीय शिक्षण परिषदेत शालेय शिक्षण दर्जेदार पद्धतीने देण्यासह विविध विषयांवर महत्त्वपूर्व चर्चा करण्यात आली.