सोलापूरचे शिवश्री बबन माने यांची मुख्य कार्यकारी संपादक पदी नियुक्ती

सोलापूरचे शिवश्री बबन माने यांची मुख्य कार्यकारी संपादक पदी नियुक्ती

“के एस न्यूज चे व्यवस्थापकीय संपादक विजय ओहोळ सर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मान”

सोलापूर प्रतिनिधी :आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल संकल्पनांचा वापर करून दहा वर्षांपूर्वी के एस न्यूज चैनल ची स्थापना करण्यात आली. वृत्तपत्राबरोबरच सोशल मीडियाची वाढती गरज ओळखून व्यवस्थापकीय संपादक विजय ओहोळ यांनी वेबसाईटच्या माध्यमातून सुरू केलेली ही न्यूज चैनल आज संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरली आहे.

सडेतोड शैलीतील बातम्या आणि निष्पक्षपणे केलेले लेखन यामुळे के एस न्यूज चैनल राज्यातील वाचक वर्गाच्या विशेष पसंतीस उतरले आहे.

याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबन माने यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविल्यामुळे त्यांची कार्यकारी संपादक पदी निवड करण्यात आली आहे. सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून शुभेच्छा देण्यात आल्या.