राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन…
शनिवार, दि.०६ डिसेंबर २०२५ रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे स. १०.०० वा. राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष मा. योगेश बहल यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, आज ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज हा देश एकसंघ आहे, त्यामुळे अनेक जाती धर्मांचे लोक गुणागोंविदाने एकत्र नांदताना दिसतात ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या भारतीय संविधाना मुळेच..! असे थोर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित दलितांचे कैवारी आणि ज्ञानाचा अथांग सागरास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्यावतीने अभिवादन

करतो.
यावेळी मा.आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष शाम लांडे, विजय लोखंडे, मा.नगरसेवक प्रकाश सोमवंशी, जितेंद्र ननावरे, बन्सी पारडे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सरचिटणीस राजेंद्र विलिया,व्हीजेएनटी सेल अध्यक्ष निर्मला माने, सहकार सेल अध्यक्ष  श्रीधर वाल्हेकर,  अर्बन सेल अध्यक्ष प्रदीप गायकवाड, उपाध्यक्ष संपत पाचुंदकर,  अकबर मुल्ला, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, पदवीधर अध्यक्ष प्रदीप औटी, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रविंद्र ओव्हाळ, तुकाराम बजबळकर, स्वराज शिंदे, उपाध्यक्ष कुमार कांबळे, सरचिटणीस राजू चांदणे, निखिल सिंह, सचिन वाल्हेकर, अविनाश सोनवणे, विवेक कांबळे, धनाजी तांबे,विक्रम पवार, सुनिल अडागळे इत्यांदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.