परदेशी - दरवडे हाइट्स सोसायटीत नवरात्री महोत्सव जल्लोषात सुरू
“उत्साह, आनंद आणि पारंपरिकता; परदेशी दरवडे हाइट्स सोसायटीत नवरात्री महोत्सवाची उधळण”
पुण्यातील साईनगर परिसरातील परदेशी दरवडे सोसायटी मध्ये नवरात्र निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
पुणे प्रतिनिधी (उषा लोखंडे ) परदेशी - दरवडे हाइट्स सोसायटीत नवरात्र महोत्सवाची सुरुवात उत्साहात झाली आहे. २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दररोज रात्री ९ ते ११:३० या वेळेत पारंपरिक आणि आधुनिक अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोसायटीतील लहान मुले, पुरुष व महिला यांच्यासाठी विविध खेळ आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. महिलांनी पारंपरिक नऊवारी पोशाख परिधान करून दांडियामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला, तर पुरुष जोशात दांडियावर नृत्य करत होते. लहान मुलांसाठी मिनिट गेम्स आणि विविध खेळ आयोजित केले होते, ज्यामुळे संपूर्ण सोसायटी परिसर आनंदात भरला आहे.
"नवरात्र म्हणजे उत्साह, भक्ती आणि एकतेचा सण...
आणि आज आपल्या परदेशी दरवडे सोसायटीमध्ये तोच रंगतदार माहोल अनुभवायला मिळत आहे.
सर्व वयोगटातील महिला, पुरुष, मुले – सगळ्यांनी मिळून या नवरात्रीत रंग भरले आहेत.
कुठे झिम्मा, फुगडी, तर कुठे गरबा-दांडिया... नृत्य, गाणी आणि आनंदाने प्रत्येक क्षण उजळून निघाला आहे.
मुलांसाठी खास खेळ, महिलांसाठी स्पर्धा आणि सगळ्यांसाठी एकत्र येऊन नाचगाणं – यामुळे आपल्या सोसायटीचा हा नवरात्र महोत्सव खऱ्या अर्थाने एकतेचा उत्सव ठरला आहे.
सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद, भक्तीचा उत्साह आणि नवरात्रीच्या सणातील तो अपार जल्लोष – हे दृश्य पाहून एकच म्हणावंसं वाटतं... 'नवरात्र रंगलं – परदेशी दरवडे सोसायटीसोबत रंगलेलं'
भोंडला हा महिलांसाठी खास कार्यक्रम ठरला असून त्यातही पारंपरिक गाणी, खेळ आणि नृत्यांनी रंगत वाढवली आहे.
नवरात्रीतील गरबा, दांडिया व भोंडला या पारंपरिक उपक्रमांमुळे सोसायटी परिसरात सणासुदीचे वातावरण अधिकच खुलले आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ घडवत परदेशी दरवडे हाइट्स सोसायटीतील हा नवरात्र महोत्सव परिसरातील एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.