कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील मतदारांनी १७ ऑगस्टपर्यंत गणना पत्रक जमा करावे

कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील मतदारांनी १७ ऑगस्टपर्यंत गणना पत्रक जमा करावे
कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील मतदारांनी १७ ऑगस्टपर्यंत गणना पत्रक जमा करावे

पुणे, दि. १३ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुण्यातील २१४ कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अद्ययावत व अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत अद्याप गणना अर्ज दाखल न केलेल्या मतदारांनी आपले गणना पत्रक १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावे, असे आवाहन २१४ कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी केले आहे.

मतदारांना आपल्या बीएलओशी संपर्क साधण्यासाठी मोबाईलमध्ये ‘ECINET’ अॅप डाउनलोड करता येणार आहे. तसेच मतदार यादीमध्ये आपले नाव शोधण्यासाठी electoralsearch.eci.gov.in आणि voters.eci.gov.in या संकेतस्थळांवर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मतदारांनी या पुनरीक्षण कार्यक्रमात सहभागी होऊन आवश्यक गणना पत्रक विहित मुदतीत जमा करावे आणि मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. भंडारे यांनी केले आहे