गोंदिया। 3 सप्टेंबर
वाढती लोकसंख्या आणि वाढती वीज वापर क्षमता यामुळे दररोज ट्रान्सफॉर्मर जळणे, लोडशेडिंग यासारख्या समस्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तासन्तास अंधारात काढावे लागत होते. आमदार विनोद अग्रवाल यांनी वीज व्यवस्थेला आधुनिक काळात महत्त्वाचे मानून याचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ग्रामीण भागातील वीज उपकेंद्रांची लोड क्षमता दुप्पट करण्याचे, नवीन उपकेंद्र सुरू करण्याचे व मंजूर उपकेंद्रांच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले होते.
याच बैठकीचा परिणाम म्हणून मंगळवार, 2 सप्टेंबर रोजी हिवरा आणि झिलमिली येथील 33/11 केव्हीच्या दोन उपकेंद्रावर 10 एमव्हीएचे नवे पॉवर ट्रान्सफॉर्मर लावून वीज सेवेला आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.
आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, आज वाढत्या वीज उपकरणांमुळे वीज वापर अधिक झाला आहे. पण वीज पुरवठ्यासाठी लाईन, ट्रान्सफॉर्मर, पॉवर ट्रान्सफॉर्मर जुने व कमी क्षमतेचेच कार्यरत होते, त्यामुळे वारंवार लोडशेडिंगची समस्या निर्माण होत होती. आम्ही उपकेंद्रात लावलेल्या 5 एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरला 10 एमव्हीए करण्यासाठी तसेच नवे उपकेंद्र सुरू करण्यासाठी निधीची मागणी शासनाकडे केली होती. त्याअंतर्गत आज हिवरा आणि झिलमिली वीज उपकेंद्रात पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवून लोड क्षमता दुप्पट करण्यात येत आहे. आता या उपकेंद्रांत 15 एमव्हीएचे पॉवर ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे या अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांना वीज खंडित होण्याच्या समस्येतून मुक्ती मिळेल आणि लोड क्षमता अधिक चांगली होईल.
५० वर्षांत जितकी लोड क्षमता, तितकी दोन वर्षांत दुप्पट करण्याचे काम सुरू..
आमदार अग्रवाल म्हणाले, गेल्या ५० वर्षांपासून नागरिक जितक्या लोड क्षमतेवर वीज व्यवस्थेवर अवलंबून होते आणि अडचणी सहन करत होते, ती क्षमता पुढील दोन वर्षांत दुप्पट करण्याचे आमचे संकल्प आहे. आज ज्या गावांत 63 केव्हीएचे ट्रान्सफॉर्मर होते ते 100 केव्हीए करण्यात आले, जिथे 100 होते ते 200 करण्यात आले. आता हिवरा व झिलमिली येथे 10 एमव्हीएचे नवे ट्रान्सफॉर्मर बसवून काटी उपकेंद्रातही दुहेरी क्षमता केली जात आहे. लवकरच बटाना, फुलचूर उपकेंद्राचे काम सुरू होईल तसेच चंगेरा उपकेंद्राचीही सुरुवात होईल.
शेतीसाठी सौर ऊर्जा कनेक्शनला प्रोत्साहन...
शेतीसाठी जी नवीन कनेक्शनची मागणी येत आहे, त्यांना एमएसईबीमार्फत सौर ऊर्जा कनेक्शन देण्यात येत आहे. सौर ऊर्जा कनेक्शनसाठी 23 हजार 400 रुपये भरल्यावर 3 एचपीची मोटार, छत्री, स्टार्टरसह बसवून दिले जात आहे, जी शासनाची शेतकरीवर्गासाठी सोयीस्कर सुविधा आहे. आपण या योजनेचा लाभ घेण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.
यांची होती उपस्थिती..
10 एमव्हीएच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या शुभारंभप्रसंगी आमदार विनोद अग्रवाल, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, कृउबास सभापती भाऊराव उके, गोंदिया झोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष रंगारी, एसई श्री. राठोड, ईई श्री. जैन, भाजप नेत्या चैतालीसिंह नागपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपाताई चंद्रिकापुरे, जि.प. सदस्य वैशाली पंधरे, रितेश मलघान, इंदलसिंह राठोड, ओंकार बहेकार, छत्रपाल तुरकर, सुजीत येवले, ओंकार नागपुरे, मोहन गौतम, कमलाबाई भांडारकर, शैलजाताई सोनवणे, विक्की बघेले, पृथ्वीसिंह नागपुरे, दिलीप मुंडेले, देवचंद नागपुरे, लखनभाऊ हरिनखेडे, चेतन बहेकार, ललित तावडे, उमेश पंडेले, राजू फुंडे, येडे जी, नेवारे जी, घोरपडे जी, बावन्थडे जी व श्री. दुबे यांच्यासह उपकेंद्राचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.