कांदिवलीत मयूर सावंत यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालय प्रमुख पदी नियुक्ती

कांदिवलीत मयूर सावंत यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  कार्यालय प्रमुख पदी नियुक्ती
 मुंबई प्रतिनिधी (रूपाली बैसाने)
 
मुंबई  उपनगरातील कांदिवली विभागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना उबाठा गटातील शिवसैनिकांनी जनता दरबार हा  उपक्रम हाती घेतला होता त्यानुसार कांदिवली पश्चिमेकडे चारकोप विधानसभा मतदारसंघात रविवारी शिवसेनेचा जनता दरबार पार पडला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांनी स्थानिकांचे  प्रश्न जाणून घेतले ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढील आठवड्यात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार  असल्याचे सांगितले

   चारकोप विधानसभा मतदारसंघातील विभाग क्रमांक दोन शिवसेना क्रमांक २० आणि २१ च्या वतीने जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू आणि आमदार अनंत (बाळा) नर यांनी परिसरातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले ते प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना फोन  करून तातडीने दखल घेण्याच्या सूचना दिल्या तसेच या  संदर्भात पुढील आठवड्यात अधिकाऱ्यांच्या बैठक प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. जनता दरबारच्या माध्यमातून तेथील जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

जनता दरबारच्या आयोजक विभाग प्रमुख संतोष राणे महिला विभाग संघटक मनाली चौकीदार ,शुभदा गुडेकर ,गीता भंडारी ,विधानसभा प्रमुख राजू खान कैलास कणसे अभिषेक शिर्के ,संतोष धनावडे ,सुषमा कदम ,विधानसभा संघटक राजेंद्र निकम सत्यवान वाणी सुवर्ण प्रसादे सविता देसाई उपविभाग प्रमुख आशिष पाटील आदी पदाधिकारी तसेच संयोजक शाखाप्रमुख विजय मालुसरे यांच्या सर्वांच्या उपस्थितीत शिवसेना शाखा क्रमांक २१  बंदर पाखाडी कांदिवली पश्चिम यांच्या कार्यालय प्रमुख पदावर मयूर सावंत यांची निवड करण्यात आली. मयूर सावंत हे सातत्याने पक्ष वाढीसाठी एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सदैव परिसरातील नागरिकांच्या जनसंपर्कात राहणाऱ्या मयूर सावंत यांना आमदार सुनीलप्रभू यांच्या हस्ते नियुक्त पत्र प्रदान करण्यात आले.