कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात संपन्न

दि ९ कल्याण ठाणे
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत दि ९ रोजी शिवराज्याभिषेक दिन (तिथीनुसार) उत्साहात संपन्न झाला. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस व आयुक्त दालनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या समयी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उप आयुक्त संजय जाधव, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, महापालिका सचिव किशोर शेळके, ३/क प्रभागाचे सहा.आयुक्त धनंजय थोरात, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत तसेच इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त डोंबिवलीतही महापालिका अतिरिक्त आयुक्त -२ योगेश गोडसे यांनी मानपाडा रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासमयी परिमंडळ-२ चे उपआयुक्त रमेश मिसाळ, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, ६/फ व ७/ग प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर तसेच इतर अधिकारी/ कर्मचारी वर्ग उपस्थित होता.