बालकामगार दिनानिमित्त राबविण्यात आली स्वाक्षरी मोहिम

बालकामगार दिनानिमित्त राबविण्यात आली स्वाक्षरी मोहिम

हिंगोली (जिमाका), दि. 12 : जगभरात 12 जून हा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर सरकारी कामगार अधिकारी कार्यालय व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. 
यावेळी सरकारी कामगार अधिकारी  एस. जी. फड, दुकाने निरीक्षक एस. जे. पेरके, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीबखान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, रेशमा पठाण, समुपदेशक सचिन पठाडे, क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत इत्यादी उपस्थित होते.