“खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा भिमरत्न पुरस्काराने गौरव”

“खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा भिमरत्न पुरस्काराने गौरव”

मी खासदार नसून जनतेची सेवक डॉ. ज्योती वाघमारे भिमरत्न पुरस्कार सन्मान सोहळा थाटात संपन्न

सोलापूर दि.२६ (प्रतिनिधी) माझी खासदार म्हणून जरी निवड झाली असली तरी मी फुले शाहू आंबेडकरी चळवळीची प्रथम कार्यकर्ती व जनतेची सेवक आहे म्हणून मी अभिमानाने भिमराज की देव असल्याचे स्वाभिमानाने सांगते असे भावनिक उद्गार राज्य सभा खासदार ज्योती वाघमारे यांनी काढले. १३५ व्या भिमजयंती च्या सन्मान सोहळा कार्यक्रमात भिमरत्न व भिमरल पुरस्कार वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात:- भारतीय राज्यघटना प्रस्ताविकेचे वाचन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय एकता दलाचे अध्यक्ष बाबा नायकवाडी हे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान सभेत परिसरात व व्यासपीठावर वृक्ष व भिमसैनिक दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत प्रबोधन विचार मंच चे अध्यक्ष विश्वास गायकवाड यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माता रमाई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार पुणे, बिदर गायकवाड, रिपब्लिकन जनशक्तीचे प्रमुख रोशन मोरे, कुर्डुवाडीचे माजी नगराध्यक्ष जनार्दन साठेसर, जनसंवाद परिषदचे प्रमुख तसेच मान्यवर उपस्थित होते. यावेळी नव्याने राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांचा शाल श्रीफळ देऊन प्रबोधन विचार मंच चे अध्यक्ष विश्वास गायकवाड व दिपक बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रमुख रंगभूमीच्या वतीने डॉ. किर्तिपाल गायकवाड, मा. प्रियांका सितारामदास, अरुण ओहोळ व अशोककुमार दिलपक यांच्या नियोजनात थोरल्या महाराष्ट्र राज्य शाखा संघटनेतील सोलापूर व महानगरपालिका महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपुर्ण दाद सन्मान, दवंदी गायकवाड व सुनीता गायकवाड यांनी डॉ. वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात भिमरत्न पुरस्काराने डॉ. किर्तिपाल गायकवाड, दत्तात्रय म्हेत्रेगण, डॉ. संतोष पाटील, देवराव विठोबा फुलकर, वासुदेव शेखरकर, सुमित्रा केकरे, सुनील डोंगे, कमलाकर सोनवणे यांना तर भिमरल पुरस्काराने शंकरराव गायकवाड, अतुल मच्छिंद्र साठे, चित्रकार जितेश मोरे, शीलाताई चंद्रकांत गायकवाड, अशोककुमार दिलपक, विठल गायकवाड, अरुण ओहोळ, डॉ. वैशाली शिंगे, राजरत्न साळुंखे, यशवंत कडुस आणि मान्यवर यांचा प्रशस्ती पत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

तरी सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रबोधन विचार मंचचे सचिन आवळे, दिपक बनसोडे, केवल फडतरे, विक्रांत दुपारगुडे, आशिषकुमार लांडगे, विक्रम कनकरे, आदींनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झुंजारराव आकसले यांनी केले तर आभार प्रदर्शन केवल फडतरे यांनी केले.

KS News सोलापूर प्रतिनिधी संदेश कांबळे