पनवेलमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ वृक्षारोपण मोहीम
पनवेल, दि. ७ : पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेची बांधीलकी जपत पनवेल महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शहरातील चारही प्रभागांमध्ये विशेष वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या सुमारे ७०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत करंज, जांभूळ, आवळा, कदंब, बकुळ यांसह विविध पर्यावरणपूरक आणि औषधी वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
प्रभाग समिती अ मध्ये नगरसेविका योगिता समीर फडके, विजयश्री संतोष पाटील, लीना नंदकुमार म्हात्रे, नगरसेवक रवींद्र भगत, नगरसेविका मोनिका महानावर यांच्यासह स्थानिक नागरिक सहभागी झाले. प्रभाग समिती ब मध्ये नगरसेवक हरेश केणी, तुषार पाटील, नगरसेविका प्रगती पाटील, लीना गरड आणि नगरसेवक उत्तम मोर्बेकर यांनी सहभाग घेतला. रोटरी क्लब ऑफ सनराईजच्या प्रतिनिधी तसेच रायन स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षकही मोहिमेत सहभागी झाले.
प्रभाग समिती क मध्ये नगरसेविका सीताताई पाटील, समाजसेवक सुनील गोवारी आणि विनय गोवारी उपस्थित होते. प्रभाग समिती ड मध्ये आयुक्त मंगेश चितळे, सभापती अजय बहिरा, नगरसेविका स्नेहल ढमाले, अॅड. मनोज भुजबळ, श्वेता बहिरा, प्रियांका कांडपिळे, रुचिता लोंढे, नगरसेवक गणेश कडू, केतन भगत, लतीफ शेख, नगरसेविका आर्या जाधव, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका सुरेखा मोहकर, समाजसेवक प्रवीण जाधव यांच्यासह मान्यवर आणि एनएसएसचे विद्यार्थी उपस्थित होते.
विविध सामाजिक संस्था, महिला मंडळे आणि समाजसेविकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उद्यान विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त डॉ. रुपाली माने आणि विभागप्रमुख अनिल कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान पर्यवेक्षक नितीन राठोड, विशाल हुडेकर, सिद्धार्थ कांबळे, मांगिलाल जाधव, कनिष्ठ अभियंते साकेत पाटील आणि अतिश पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मोहिमेचे नियोजन केले.
महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, जितेंद्र मढवी तसेच विविध प्रभागांतील स्वच्छता निरीक्षकही उपस्थित होते.
रोपांच्या संगोपनाचा संकल्प
वृक्षारोपण केल्यानंतर केवळ झाडे लावण्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्या योग्य संगोपनाची आणि संवर्धनाची जबाबदारी घेण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत पनवेल शहर अधिक हरित, आरोग्यदायी आणि निसर्गरम्य करण्याच्या दिशेने महापालिकेने पाऊल उचलले आहे.
‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून मातांच्या गौरवार्थ लावलेली ही झाडे भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध हवा, सावली आणि पर्यावरणीय समृद्धीचा वारसा ठरतील, असा विश्वास लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.