मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मार्को रुबियो यांचे स्वागत गेटवे ऑफ इंडिया येथे ऐतिहासिक भेट
मुंबई, दि. २० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक पद्धतीने शाल पांघरून रुबियो यांचा सन्मान केला.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि मार्को रुबियो यांच्यात संवाद झाला. मुख्यमंत्र्यांनी गेटवे ऑफ इंडिया आणि परिसराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाची माहिती रुबियो यांना दिली. त्यानंतर दोघांनी परिसराची पाहणी केली.
या वेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेशचंद्र, राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसमवेत आलेले शिष्टमंडळ उपस्थित होते.