संभाजी ब्रिगेडकडून धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रतिमेला शेणाचा अभिषेक; निषेध व्यक्त

संभाजी ब्रिगेडकडून धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रतिमेला शेणाचा अभिषेक; निषेध व्यक्त

KS News सोलापूर प्रतिनिधी संदेश कांबळे 

सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बागेश्वरचे धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रतिमेला चार हुतात्मा चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेणाचा अभिषेक करण्यात आला. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवला.

यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी साधू-बुवांनी आपल्या मठात राहून अध्यात्माचे कार्य करावे, समाजात जातीय तेढ निर्माण करणारे विधान टाळावे, अशी भूमिका मांडली. तसेच महाराष्ट्रात काही ढोंगी साधूंना सरकारी पाठबळ मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला.

इतिहासाचे योग्य ज्ञान नसताना इतिहासावर भाष्य करू नये, अन्यथा संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीने विरोध करेल आणि अशा व्यक्तींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनलदास, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र माने, उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे, जिल्हा संघटक दिलीप भोसले, मोहोळ तालुका अध्यक्ष अंजली भोसले आणि मोहोळ शहराध्यक्ष अंजली मोहिते यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.