भिवंडी महापालिकेत श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन साजरा
भिवंडी, दि. 13 : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने तळ मजल्यावर आयोजित कार्यक्रमात सहायक आयुक्त अरविंद घुगरे यांच्या हस्ते भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 29 डिसेंबर 2025 आणि 23 एप्रिल 2026 रोजीच्या परिपत्रकान्वये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.