अवैधरित्या धारदार 4 शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपीस चाकण पोलिसांकडून अटक
दि. 28/03/2026
चाकण पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग दरम्यान पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहितेवाडी, ता. खेड, जि. पुणे येथील शाळेच्या मागील मोकळ्या जागेत एक इसम अवैधरित्या धारदार शस्त्रांसह थांबलेला आहे.
सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन सापळा रचून इसमास ताब्यात घेतले. त्यास पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून 02 लोखंडी तलवारी व 02 लोखंडी सुरा असा एकूण अंदाजे किंमत रु. 2,800/- चा मुद्देमाल मिळून आला.
सदर प्रकरणी आरोपी नाव शरद परशुराम पोतले , वय 44 वर्षे, रा. मोहितेवाडी, ता. खेड, जि. पुणे याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायदा कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई चाकण उत्तर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पोलीस हवालदार भैरोबा यादव, योगेश कोळेकर, प्रीतम ढमढेरे,पोलिस अंमलदार महेश कोळी, शिवाजी लोखंडे,सुमीत जगझाप,रमेश कांबळे,संतोष फटांगरे यांनी ही कारवाई केली.
पुढील तपास चाकण उत्तर पोलीस स्टेशन कडील पोलीस हवालदार कोळेकर करीत आहेत.
— चाकण उत्तर पोलीस ठाणे
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय