सायबर फसवणुक करण्यासाठी गरीब लोकांचे बँक खात्याचा वापर करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गोवा येथून अटक

सायबर फसवणुक करण्यासाठी गरीब लोकांचे बँक खात्याचा वापर करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गोवा येथून अटक
ठाणे शांतीनगर पोलीस स्टेशन, गु.रजि. कलम सह भारतीय तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६सी, ६६डी प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी यांनी फिर्यादिला नोकरीचे अमिष दाखवून फिर्यादिचे महाराष्ट्र बैंक, भिवंडी येथे बँक खाते उघडून बँकेचे पासबुक, एटीएम कार्ड, सिमकार्ड असे फसवणुकीच्या उद्देशाने गोवा राज्यात सायबर गुन्हेगार यांचेकडे पाठवले होते. फिर्यादीला अजुन नोकरी मिळत नाही म्हणून त्याने बँकेत जावून आपले बँक खात्या बाबत खात्री केली असता सायबर गुन्हेगारांनी फिर्यादीचे बँक खात्यावर ऑनलाईन सायबर फसवणुकीचे पैसे वर्ग केल्याचे दिसून आल्याने, सदरचा गुन्हा आरोपी १) राम गुप्ता २) अली मोमीन ३) नावेद शेख यांचे विरूध्द दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे तपासात आरोपी राम गुप्ता याचेकडे तपास केला असता, त्यात त्यांनी भिवंडी शहरात अशाच प्रकारे ७० ते ८० लोकांचे महाराष्ट्र बँक, इंडियन बँक व इतर बँकेत बँक खाते उघडून ते सायबर ऑनलाईन फसवणुक करण्यासाठी गोवा व मध्य प्रदेश येथे पाठविण्यात आल्याची माहिती पोलीसांना दिली होती. सदर गोवा येथील सायबर गुन्हेगांराच्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून, शांतीनगर पोलीस स्टेशनचे सायबर क्राईम पथकाचे पोउपनिरी/सचिन कुचेकर, पोकों/दिपक सानप, पोकों/रोहित इंगले यांनी वास्को दक्षिण गोवा, येथील सुप्रिम हॉटेलमध्ये छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी ०७ इसम हे मोबाईलद्वारे ऑनलाईन फसवणुक करीत असल्याचे दिसून आले. सदर सात इसमांचे ताब्यातून ऑनलाईन फसवणुक करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन लॅपटॉप, ३० मोबाईल फोन व ११ इतर खातेदारांचे साधना सहकारी बँक ली. नागपुर येथील बँक खात्याचे पासबुक, एटीएम कार्ड प्रत्येक पासबुक सोबत एक मोबाईल सिमकार्ड असा एकुण ५,१०,०००/- रू किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. सदर सायबर गुन्हे करणारे इसम १) आनंद आशोक मेघवानी, वय ३४ वर्षे, राह. सिंधी कॉलनी, स्टेशन जंग, नरसिंगपुर, मध्य प्रदेश २) भोला प्रदिप यादव, वय २१ वर्षे, राह. कटोरीया, दुलीसार, पोस्ट कटोरीया, पो. ठाणे कटोरीया, जिल्हा - बाका, राज्य - बिहार ३) लालचंद सुनिल मुखीया, वय २५ वर्षे, राह. आंदोली, पोस्ट अंदोली, पो. ठाणे अलीनगर, जि. दरभंगा, बिहार, ४) गौरव भुवनेश्वर यादव, वय २५ वर्षे, राह. कठोन, पोस्ट कटोरीया, पो. ठाणे कटोरीया, जि. बाका, राज्य - बिहार ५) रोहितकुमार प्रमोद यादव, वय २१ वर्षे, राह. बेरीसाल, पोस्ट कटोरीया, जि. बाका, राज्य बिहार ६) राजाकुमार चक्रधर यादव, वय २१ वर्षे, राह. तरगच्छा, पोस्ट- पपरेग, पो. ठाणे कटोरीया, जि. बाका, राज्य बिहार ७) सौरभ अशोक शर्मा, वय ४० वर्षे, राह. राजनानगांव, इंदिरानगर चौक, बसंतपुर, छत्तीसगड यांना अटक करण्यात आलेली आहे.
 
सदर आरोपीत हे व त्याचा मुख्य सुत्रधार हे गरीब लोकांचे बँक खाते बँकेत उघडून त्या गरीब लोकांचे पासबुक, एटीएम कार्ड व सिमकार्ड स्थानिक एजंट मार्फत त्यांचेकडे मागून घेत असत व या लोकांच्या बँक खात्यावर सायबर फसवणुकीचे व गेमिंगचे पैसे वळवून घेत असत. अशा प्रकारे प्रत्येक १५ दिवसांनी स्थान बदल करून, हे सायबर फसवणुक करत असत. सदर आरोपीतांना वास्को दक्षिण गोवा येथून ताब्यात घेवून दिनांक १८/०८/२०२५ रोजी अटक केली आहे. त्यांना मा. न्यायालयात हजर केले असता त्यांचे दिनांक २५/०८/२०२५ रोजी पावेतो पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे. सदर इसम हे गोवा येथे हॉटेलमध्ये थांबून, महाराष्ट्रील गरीब अशिक्षीत लोकांकडून ५००० रू किंमतीला त्यांचे बँक खात्याचे किट व मोबाईल सिमकार्ड घेवून त्याचा लोकांची सायबर ऑनलाईन फसवणुक करण्यासाठी उपयोग करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
 
सदरची कारवाई ही पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - २, भिवंडी शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त, पुर्व विभाग, भिवंडी संचिन सांगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक  विनायक गायकवाड यांचे मार्गदशनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक  विनोद पाटील, तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे अतुल अड्डुरकर, पोउपनिरी/सचिन कुचेकर, पोहवा शिरोसे, पोकॉ दिपक सानप, पोकॉ कुशल जाधव, पोकॉ रोहित इंगळे, पोकों गडाख व पथकाने केलेली आहे.