विनयभंग प्रकरणात एक वर्षापासून फरार पाहिजे आरोपीस जेरबंद करत ठोकल्या बेड्या

विनयभंग प्रकरणात एक वर्षापासून फरार पाहिजे आरोपीस जेरबंद करत ठोकल्या बेड्या

गोंदिया :– दिनांक 13 फेब्रुवारी 2025 आरोपी नामे - सतिश जयलाल ठाकरे वय 45 वर्ष रा. बनाथर ता. जि. गोंदिया याने अल्पवयीन पीडित मुलीचा विनयभंग केल्याने तक्रारीवरुन पोलीस ठाणे रावणवाडी येथे गुन्हा क्रमांक 11/2024 कलम 354(अ), 506 भा दं वी प्रमाणे दिनांक 09/01/2024 रोजी दाखल करण्यात आले होते...आरोपी हा घटने दिवसापासुन पळून गेलेला होता...... माननीय वरिष्ठांच्या निर्देश सूचनेप्रमाणे सदर गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने आरोपीचा कसून शोध घेण्यात येत होता.आरोपी याचे जवळ कोणत्याही प्रकारचा मोबाईल फोन किंवा त्याचा राहण्याचा ठाव ठिकाण बाबत कुठलीही माहिती पोलिसांना मिळत नसल्याने तसेच तो सराईत गुन्हेगार असल्याने व यापुर्वी त्याचेवर पोलीस ठाणेस खुना सारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याने प्रसार माध्यमांद्वारे त्याचे शोध बाबत माहिती प्रसारीत करण्यात आली होती..परंतु तो पोलीसां च्या हाती लागला नाही... म्हणुन त्याचे विरोधात मा. न्यायालयात कलम 299 सि.आर.पी. सी. प्रमाणे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.....मागील एक वर्षापासून सदर  प्रकरणात आरोपी हा पाहिजे होता त्यामुळे सतत पोलीस त्याचे शोधात होते.....आज दिनांक- 13/02/2025 रोजी आरोपी हा एक वर्षानंतर पोलीस ठाणे रावणवाडी हद्दीत वावरत असल्याची गोपनिय बातमी पोलीसांना मिळताच पोलीस ठाणेस हजर पोलीस हवालदार अरविंद चौधरी व पोलीस पथक यांनी आरोपीला रजेगांव परीसरातुन जेरबंद करून ताब्यात घेतले..... सदर आरोपीस नमूद गुन्ह्यांत अटक करुन मा. न्यायालयात हजर  करण्यात आले असता मा. न्यायालयाने आरोपी यास MCR वर भंडारा जेलमध्ये रवाना केले आहे... सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्रीमती रोहीणी बानकर, मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे रावणवाडीचे प्रभारी अधिकारी पो.नि. चंद्रकांत काळे, स.पो.नि. सुनिल अंबुरे, पो. हवा. अरविंद चौधरी, पो. शि. आशिष वैद्य, यांनी  कामगीरी बजावली आहे.