पुणे पोलिस दलातील फौजदाराची लोणावळ्यात गळफास घेऊन आत्महत्या

पुणे पोलिस दलातील फौजदाराची लोणावळ्यात गळफास घेऊन आत्महत्या

पुणे :-पुणे शहर पोलिस दलातील एका फौजदाराने लोणावळ्यात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अण्णा गुंजाळ असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे  नाव आहे.
तीन दिवसापासून गुंजाळ गैरहजर होते. त्यांचा फोन देखील लागत नव्हता. आज खडकी पोलीस त्यांची मिसिंग घेणार होते. त्यापूर्वी गुंजाळ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लोणावळा पोलीसांनी कळविले. खडकी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे गुंजाळ अधिकारी होते.