वैदयकीय औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर, विक्री व साठा करणारी टोळी ताब्यात

वैदयकीय औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर, विक्री व साठा करणारी टोळी ताब्यात

महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे, मिरज यांची कारवाई 

मिरज प्रतिनिधी :- दि.२०/०९/२०२५ रोजी म. गांधी चौक पोलीस ठाणे कडील पोना/४१७ राहुल क्षिरसागर यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम गूंगीकारक व नशेसाठी वापरण्यात येणारी औषधे बेकायदेशीरपणे विक्री करण्याकरीता आंबेडकर उद्यान परिसरात येणार आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोना राहुल क्षिरसागर यांनी सदरची माहिती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सपोनि संदीप शिंदे यांना कळविली. सपोनि संदीप शिंदे यांनी तात्काळ पोलीस ठाणे कडील डिबी पथकातील संदीप गुरव पोलीस उपनिरीक्षक पांना मिळाले बातमीप्रमाणे डिबी पथकासह कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. नमुद पथकाने तात्काळ कारवाई करीत दोन शासकीय पंच व सह अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली कार्यालयाकडील औषध निरीक्षक राहुल करंडे यांचेसह रवाना होवून बातमीतील नमुद ठिकाणी पथकासह सापळा लावला असता आंबेडकर उद्यानच्या पाठीमागील बाजुस बातमीतील नमुद संशयीत इसम येवुन थांबले. त्यापैकी एका इसमाने त्यांचेकडील पिशवीमधुन वस्तु काढून त्याचे सोबत असलेल्या इसमाकडे दिली. त्याने ती त्याचेकडील पिशवीत ठेवली. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने नमुद पथकाने संशयितांना पळुन जाण्याची संधी न देता त्यांना जागीच पकडून त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १) रोहीत अशोक कागवाडे वय ४४ वर्षे रा. शामरावनगर, आकांशा मेडीकल वरील बाजुस, सांगली व २) ऑकार रविंद्र मुळे वय २४ वर्षे रा. गव्हमेंट कॉलनी, विजय कॉलनी, विश्रामबाग सांगली अशी सांगितली. नमुद इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेता रोहीत कागवाडे यांचे हातातील पिशवीमध्ये अवैधरित्या नशेसाठी वापरण्यात येणा-या इंजेक्शनच्या २८ बाटल्या व ओंकार मुळे यांचे हातातील पिशवीमध्ये २३ बाटल्या अशा एकुण ५१ बाटल्या मिळुन आल्या. सदर मिळुन आलेल्या औषयाबाबत पथकासह असलेले राहुल करंडे, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग यांचेकडुन खात्री केली असता त्यांनी सदरची औषधे ही मानवी जिवितास अपायकारक असुन ती मान्यताप्राप्त डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय विक्री करण्यास बंदी असल्याचे सांगितले. सदर मुद्देमाल जागीच जप्त करुन ताब्यातील संशयितांकडे पुढील चौकशी करुन माहिती घेतली असता त्यांनी सदचा मुद्देमलातील इंजेक्शन हे नशेकरीता वापरले जात असुन ती अवैधरित्या चढ्या भावाने विक्री करण्याठी आशपाक पटवेगार रा. पत्रकारनगर, सांगली यांचेकडून त्यांचे घरातुन विकत घेवुन गिन्हाईकांना ८००/- रुपयेस विक्री करत असल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीवरुन नमुद पथकाने तात्काळ कारवाई करीत आशपाक पटवेगार यांचे असुबा हॉटेलसमोर, पत्रकारनगर सांगली येथील घरी जावून पंचासमक्ष छापा टाकला असता, सदर घरामध्ये असलेल्या इसमाने त्याचे नाव गाव अशपाक बशीर पटवेगार वय ५० वर्षे रा. असुबा हॉटेलसमोर, पत्रकारनगर सांगली असे सांगितले. नमुद पथकाने रोहीत कागवाडे व ओंकार मुळे यांचे कब्जात मिळून आले औषधाबाबत माहिती देवून अशपाक पटवेगार यास घरात असलेल्या औषध साठ्याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी सुरुवातीस कोणतीही समाधानकारक माहिती दिली नाही. त्यानंतर नमुद पथकाने आशपाक पटवेगार यांचे घराची पंचासमक्ष झडती घेतली असता अशपाक पटवेगार यांचे राहते घरामध्ये दुसऱ्या मजल्यावरील उत्तराभिमुखी हॉलमध्ये लहान मोठे बॉक्स मिळून आले. सदरचे बॉक्स उघडुन पाहता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीची नशेकामी वापरण्यात येणारे इंजेक्शन व टैबलेट मिळुन आले आहेत. मिळुन आले इंजेक्शन राहुल
करंडे अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली यांनी तपासणी करुन सांगितले की, सदरची सर्व इंजेक्शन हे मानवी जिवितास अपायकारक असुन ती मान्यताप्राप्त डॉक्टरांचे चिठ्ठीशिवाय विक्री करण्यास व वापरण्यास बंदी असल्याचे सांगीतल्याने सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यरात आलेला आहे. अशपाक पटवेगार याचे राहते घरामध्ये विविध कंपनीच्या एकुण १३६० नशेच्या इंजेक्शन बॉटल, १७६ विवीध गोळयांचे पाकिटे मिळुन आले आहेत. नमुद पथकाने तेथे उभ्या आसलेल्या चारचाकी वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये देखील ९६ नशेच्या इंजेक्शन बॉटल मिळुन आल्या आहेत. मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सर, सांगली मा. रितु खोकर मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली तसेच मा. प्रणिल गिल्डा सर, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग मिरज यांनी मिरज यांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील श्री संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी, धनंजय चव्हाण, पोलीस हवालदार-सचिन कुंभार, सर्जेराव पवार, अभिजीत पाटील, सुरज पाटील, अभिजीत धनगर, पोलीस नाईक- नानासाहेब चंदनशिवे, राहुल क्षिरसागर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर, विकास कांबळे, राजेंद्र हारगे, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोसीन टिनमेकर, चालक पोलीस नाईक-देवानंद नागरगोजे, चालक पोलीस कॉन्स्टेबल-हणमंत कोळेकर, सायबर शाखा पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, पोलीस कॉन्स्टेबल-कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, म. गांधी पोलीस ठाणे, सांगली हे करीत आहेत.