ॲम्ब्युलन्स चालविण्यासाठी दरमहा ३५ हजारांची खंडणी मागितली; तीन जणांना अटक.

ॲम्ब्युलन्स चालविण्यासाठी दरमहा ३५ हजारांची खंडणी मागितली; तीन जणांना अटक.

पिंपरी :-चाकण परिसरात ॲम्ब्युलन्स चालवण्यासाठी महिन्याला पाच हजार रुपये खंडणी देण्याची मागणी करत पाच जणांनी तरुणावर कोयत्याने वार केले. तसेच मोटारीची तोडफोड करत कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. ही घटना सोमवारी (दि.३) रात्री खराबवाडी येथे घडली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
विष्णू ऊर्फ बाळा नामदेव कुऱ्हाडे (वय ३०), किशोर ऊर्फ साईनाथ नामदेव कुऱ्हाडे (२८), ओमकार गौतम टोके (२२, रा. मेदनकरवाडी, चाकण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह ऋषिकेश सूर्यकांत सूळ आणि मट्या (पूर्ण नाव नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिषेक सुनील पानसरे (२२, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी अभिषेक आणि त्यांचा मित्र प्रतीक जाधव याच्या ॲम्ब्युलन्स चाकण परिसरात चालू ठेवण्यासाठी संशयितांना प्रत्येक ॲम्ब्युलन्समागे पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे ऋषिकेश याने अभिषेक यांना सांगितले. त्यानंतर कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण करून दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अभिषेक यांनी पाठलाग करून ओमकार टोके याला पकडले.