दि.०४/०४/२०२५ रोजी सायंकाळी स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिर्यादी व स्वारगेट पो.स्टे.च्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नामे सचिन माने याचेवर देशी पिस्टल व धारदार शस्त्राने वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याबाबत स्वारगेट पो.स्टे. येथे गु. रजि.क्र. ९३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९.३ (५) सह आर्म अॅक्ट कलम ३ (२५), (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) सह १३५ सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंन्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा, दि.०५/०४/२०२५ रोजी दाखल करण्यात आला होता. घडलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून बरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी तातडीने दाखल गुन्ह्यातील आरोपी अटक करणे बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पो.स्टे. श्री. युवराज नांद्रे यांना सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने वपोनि, स्वारगेट पो.स्टे. यांनी, स्वागरेट पो.स्टे. कडील पो. अधिकारी व पो. अंमलदार यांची दोन पथके तयार करुन आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका पथकातील पोलीस अंमलदार विक्रम सावंत यांना त्यांच्या गुप्त बातमीदारकडून बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी व्हिआयटी होस्टेल चौक, अप्पर इंदिरानगर भागात येणार आहेत. सदर मिळालेली बातमी वरिष्ठांना कळविताच त्यांनी तातडीने कायदेशीर करवाई करण्याचे आदेश दिल्याने व्हिआयटी होस्टेल चौक, अप्पर या भागात दि.०५/०४/२०२५ रोजी सापळा रचून आरोपींना कौशल्यपुर्वक ताब्यात घेतले असता, त्यातील प्रमुख आरोपी याने त्याचे नाव प्रकाश ऊर्फ पक्या तुळशीराम पवार, वय २३ वर्षे, रा. गोसावी वस्ती, देसाईनगर, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. तसेच त्याचे सोबत सदर वेळी गुन्ह्यामध्ये सहभागी असलेली दोन अल्पवयीन मुले होती. त्या सर्वांनी मिळून जुन्या भांडणाचा राग मनामध्ये धरुन फिर्यादी व त्यांचा मित्र नामे सचिन माने यास पिस्टलचा वापर करुन व धारदार शस्त्राच्या सहाय्याने वार करुन खून करण्याचा प्रयत्न केल्याचे कबुल केल्याने त्यांना दाखल गुन्ह्यामध्ये ताब्यामध्ये घेवून पुढील कायदेशीर कारवाईकामी स्वारगेट पो.स्टे. येथे आणून गुन्ह्यातील प्रमुख आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. तसेच दोन विधी संघर्षीत मुलांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
दाखल गुन्ह्यामधील प्रमुख आरोपीस मा. न्यायालया समक्ष हजर केले असता त्यास ०३ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर करण्यात आली असून सदर मुदतीमध्ये तपास करुन आरोपीकडून गुन्ह्यामध्ये वापरलेले ०१ देशी बनावटीचे पिस्टल, मॅग्झिन, ०१ जिवंत काडतूस, धारदार शस्त्र व गुन्ह्यामध्ये वारलेले वाहन जप्त करण्यात आले असून सदर आरोपीने गुन्ह्यातील पिस्टलचा वापर यापुर्वी कोठे केला आहे का तसेच सदर पिस्टल त्याने कोठून मिळविले याबाबत सखोल तपास गुन्ह्याचे तपास अधिकारी पो. नि. (गुन्हे) स्वारगेट पो.स्टे. श्री. विकास भारमळ, हे करीत आहेत.
सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग (अति. कार्यभार), पुणे, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परि. २. पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पो.स्टे.श्री. युवराज नांद्रे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विकास भारमळ, सपोफौ संजय भापकर, पो. अं. रमाकांत भालेराव, कुंदन शिंदे, दिनेश भांदुर्गे, श्रीधर पाटील, सुधीर इंगळे, शंकर संपते, सागर केकाण, सतिश कुंभार, विक्रम सावंत, राहुल तांबे, शितल गायकवाड यांनी केलेली आहे.