महात्मा फुले जयंती समारंभात सर्व समाजाने सहभागी व्हावे- जयंती उत्सव समितीचे आव्हान !

महात्मा फुले जयंती समारंभात सर्व समाजाने सहभागी व्हावे- जयंती उत्सव समितीचे आव्हान !

पुसद - क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची १९८ वी जयंती पुसद शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून यावर्षी प्रथमच "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समिती २०२५" चे गठण करण्यात आले आहे. सर्व जाती-धर्मातील नागरिकांना घेऊन गठीत करण्यात आलेल्या जयंती उत्सव समितीच्या वतीने आज दि. ९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विभामगृह पुसद येथे पत्रकार परीषद आयोजित करण्यात आली होती.या पत्रकार परिषदेत म.फुले जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक व कोषाध्यक्ष आत्माराम जाधव, समितीचे अध्यक्ष बुध्दरत्न भालेराव, कार्याध्यक्ष नारायणराव ठोके,सचिव उमाकांत सोनटक्के यांनी जयंती उत्सव समितिने आयोजित केलेल्या महात्मा फुले यांच्या जयंती समारंभाची सविस्तर माहिती दिली. दि.११ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वा महात्मा जोतीराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात येईल.त्यानंतर सकाळी ९ वा. बाईक रॅलीस प्रारंभ होणार असून म.फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,तीन पुतळे चौक,सुभाषचंद्र बोस चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,मुखरे चौक,वसंतराव नाईक चौक,बिरसा मुंडा चौक या मार्गाने मार्गक्रमण करणार असून टिळक स्मारक,दत्त मंदीराजवळील मैदानात बाईक रॅलीचा समारोप करण्यात येईल.त्यानंतर ठिक १०.३० वा.संत सावता माळी नागरी सहकारी पतसंस्था,पुसद चे अध्यक्ष आत्माराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य जयंती उत्सव समारंभास सुरुवात होणार असून राज्याचे युवा राज्यमंत्री व पुसद‌चे सुपूत्र मा.ना.इंद्रनिल नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील प्रख्यात विचारवंत व राष्ट्रीय प्रबोधनकार मा.इंजि.अरविंद माळी यांचे "महात्मा फुलेंचे समाज कार्य व सत्यशोधक समाज निर्मितिचे प्रयोजन "या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. याच कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल प्राप्त काही खेळाडू व सामाजिक क्षेत्रात रुग्णसेवक म्हणून कार्य करणाऱ्या रुग्णसेवकाचा सत्कार करण्यात येणार आहे. महात्मा फुले यांच्या जयंती समारंभास सर्व समाज बांधव व भगिनिंनी उपस्थित रहावे असे आवाहन महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समितिने केले आहे.