आंबेगाव पोलीस स्टेशनची कामगिरी
पुणे शहर आंबेगाव पोलीस स्टेशन दिनांक १६/०३/२०२५ रोजी पहाटे ३.०० वा सुमारास सन ६७, संतोषमाता मंदीर, तिरुपती कॉलनी येथे तक्रादार यांच्या राहत्या घरी चोरी झाल्यात आंबेगाव पोलीस ठाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयांत आंबेगाव पोलीस ठाण्याचे तपासपथकातील पोहवा हनमंत मासाळ व चेतन गोरे यांना मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे तपासकपथाचे पोउनि कळमकर व टिमने इसम नामे १) आयुष संजय खरात वय-२० वर्ष रा- सुखसागर नगर पुणे, २) आर्यन कैलास आगलावे वय १९ वर्ष रा- गोकुळनगर पुणे यांना यांना अटक करुन त्यांच्याकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघकीस आले आहेत.
१) आंबेगाव पोलीस ठाणे गुन्हा
२) भारती विदयापीठ पोलीस ठाणे गुन्हा
३) भारती विदयापीठ पोलीस ठाणे गुन्हा
४) मार्केडयार्ड पोलीस ठाणे गुन्हा
सदर आरोपीकडुन २२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ०४ लॅपटॉप, मोटारसायकल, रिक्षा असा असा एकुण ४,६६,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. यातील आरोपीत आर्यन आगलावे हा कोंढवा व मार्केटयाडे येथील घर फोडीच्या गुन्हयात पाहिजे आरोपी आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास आंबेगाव पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोउनि मोहन कळमकर हे करत आहेत. सदरची कारवाई अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, स्मार्तना पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ पुणे, राहुल आवारे सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, सपोनि प्रियंका गोरे, पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शेलेंद्र साठे, हनमंत मासाळ, चेतन गोरे, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, यांच्या पथकाने केली आहे