बाबासाहेबांचा जाज्वल्य इतिहासाचे हुबेहूब सादरीकरण...

बाबासाहेबांचा जाज्वल्य इतिहासाचे  हुबेहूब सादरीकरण...
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
 
 धमक्रांती प्रज्ञापर्व, आयोजित धम्मनायक सम्राट अशोक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने काल दिनांक 8 एप्रिल रोजी   दुसऱ्या सत्रामध्ये  
अभ्युदय आर्ट अकॅडमी हैदराबाद, प्रणित  संघम शरणं गच्छामि!! नाटिकेचे ऐतिहासिक सादरीकरण करण्यात आले.
 
यशवंत रंगमंदिर येथे आयोजित केलेल्या प्रज्ञा पर्व समितीच्या दुसऱ्या सत्रामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला विनम्र अभिवादन करण्यात आले.

 
 
यावेळी समता महिला मंडळ व अशोक पार्क, लुबिनी, महिला मंडळ  संभाजीनगर यांच्या वतीने सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
 
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना किशोर कांबळे यांनी उपस्थित धम्म बांधव व जनसमुदाय आयोजित नाट्यकर्मी कलाकार यांना उत्तम साथ देऊन आनंद व्यक्त करावा असे आवाहन करण्यात आले 
 
अभ्युदय आर्ट अकॅडमी हैदराबाद, आयोजित  संघम शरणं गच्छामि!! नाटिकेचा कला अविष्कार सादर 
करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील  सर्वच पैलू तसेच संघर्षाच्या जाज्वल्य इतिहासाची  मांडणी केली, यामध्ये बाबासाहेबाचा जन्म, विवाह, विदेशातील विविध पदव्या घेऊन  केलेले शिक्षण, राजे सयाजीराव बडोदे यामधील नोकरी अशा विविध पैलूवर  प्रकाश टाकण्यात आला.
यामधील  डॉ. बाबासाहेबांची भूमिका सादर करणारे कलाकार यांनी  बाबासाहेबांचा जीवन संघर्ष  यशवंत रंगमंदिराच्या पटलावर सादर केला., 
 
सामाजिक जीवनामध्ये जातीय अस्पृश्यतेचे चटके,महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, महात्मा गांधी यांच्या बरोबरचा पुणे करार,
बाबासाहेबांच्या लहान मुलाचे निधन, व माता रमाईचा संघर्ष,व फाटक्या लुगड्यातील दृश्य बघताना उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या शेवटी बाबासाहेबांचा पुतळा बोलका होऊन म्हणत होता की माझा संघर्ष वंचित श्रमिक मजूर महिला उपेक्षित यांना भारतीय संविधानाच्या
माध्यमातून न्याय देण्याचे उत्तम काम करेल 
असा आत्मविश्वास नाटीकेतून त्यांनी व्यक्त केला. 
 
अभ्युदय आर्ट अकॅडमी हैदराबाद, निर्मित संघम शरणं गच्छामि!! नाटिका सादर करणाऱ्या सर्व कलाकार यांचे उपस्थित सर्व जनसमुदायाने टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.
 
या नाटिकेने पुसद येथे कलेच्या माध्यमातून इतिहासाची पुनरावृत्ती केल्याचे दृश्य  बघावयास मिळाले.
 
यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती पूजनीय भन्तेजी कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर कांबळे, समिती अध्यक्ष मिलिंद जाधव,कांबळे,माजी प्रज्ञापर्व अध्यक्ष सुखदेवराव भगत,मिलिंद हट्टेकर,सुरज वरठी,तसेच किशोर भाऊ मुजमुले, प्रभाकर टेटर,श्रीराम पवार,उपकार्यकारी अभियंता सतीश नांदगावकर,एडवोकेट आरिफ अहेमद तसेच हे नाटिका पाहण्यासाठी  महिला, बालक, युवक धम्मबांधव यांच्या उपस्थितीने यशवंत रंगमंदिराचे मैदान  खचाखच भरले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल भालेराव, तर आभार एडवोकेट पद्माकर विघ्ने यांनी केले.