यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र (अग्नीशस्त्र) बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 22/04/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद यांना गुप्त बातमीदाराव्दारे माहीती मिळाली कि, उमरखेड येथील भगतसिंग वार्ड करोडी रोड परिसरात एका इसमाकडे गावठी बनावटीचा देशी कटटा (पिस्टल) असून तो उमरखेड शहरात फिरत आहे. अशी गोपनीय माहिती मिळाल्याने स्थागुशा पथक तात्काळ पंचासह उमरखेड येथे रवाना होवून संशयीत माहीती मिळाले इसमाचा कसुन शोध घेवुन त्यास उमरखेड शहरातुन ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव देवाशिष ऊर्फ देवा कैलास मांदळे वय 23 वर्ष, सध्या रा. भगतसिंग वार्ड करोडी रोड उमरखेड मुळ रा. मुडाणा ता. महागांव जि. यवतमाळ याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे जवळ गावठी बनावटीचा देशी कटटा (अग्नीस्त्र) किंमत अंदाजे 30,000/- रुपये चा मुददेमाल जप्त करुन ताब्यात घेवून नमूद इसम यांच्या
विरुध्द पोलीस स्टेशन उमरखेड येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 अन्वये गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. पियुष जगताप सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड सा, मा.पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोउपनि/शरद लोहकरे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच सायबर पोलीस ठाणे यवतमाळचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.