पुणे : संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नुकतेच आपल्या लाडक्या “श्रीं” ची मूर्ती घडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मृदेचे पूजन अत्यंत श्रद्धा व भक्तीभावाने संपन्न झाले.
हा सोहळा रास्ता पेठेतील मूर्तिकार श्री. अभिजीत धोंडफळे यांच्या स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आला होता. पूजनकार्य मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत शेटे यांच्या हस्ते तसेच उपाध्यक्ष, विश्वस्त मंडळी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
मूर्ती घडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मृदेचे विधिवत पूजन करण्यात आले. मंत्रोच्चार व भक्तिपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. यावेळी श्रींच्या आगमनाची चाहूल सर्वत्र जाणवली आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले.
हा पवित्र सोहळा मोठ्या भक्तीभावाने पार पडताच सर्वांनी एकमुखाने जयघोष केला.