डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या अध्यक्षपदी सचिन गायकवाड यांची निवड...

पिंपरी :-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या अध्यक्षपदी सचिन गायकवाड यांची एकमताने निवड झाली. दापोडीतील महात्मा फुले नगरमधील धम्म दिप बुद्ध विहारात घेण्यात आलेल्या सभेत २०२५-२६ या वर्षासाठी नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली.
समितीचे माजी अध्यक्ष तेजस कांबळे यांनी २०२४-२५चा अहवाल सादर केला. यावेळी समितीचे माजी अध्यक्ष तेजस कांबळे तसेच आयोजक योगेश सूर्यवंशी यांनी सचिन गायकवाड यांची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या अध्यक्षपदी निवडीसाठी घोषणा केली. यावेळी धम्म दिप बुद्ध विहारचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.