पिंपरी चिंचवड मध्ये ओबीसी कार्यकर्ता बैठक संपन्न.....

पिंपरी चिंचवड मध्ये ओबीसी कार्यकर्ता बैठक संपन्न.....

 पिंपरी : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने शहरातील ओबीसी कार्यकर्त्यांची निर्णायक बैठक आयोजित केली होती. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थित कार्यकर्त्यांना ओबीसी नेते राजाराम पाटील, एडवोकेट मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील, स्थायी समिती माजी अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे, आप शहराध्यक्ष रविराज काळे, मा. नगरसेवक राजू दुर्गे, पुंडलिक सैदाने, विद्याधर मानकर, आनंदा कुदळे, नकुल महाजन आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.


ओबीसी समूहातील सर्व घटकांनी प्रत्येक पक्षाला पत्र देऊन मूळ ओबीसीलाच आरक्षित जागेवर उमेदवारी द्यावी अन्यथा ओबीसींनी सर्व जागेवर निवडणूक लढण्याची तयारी करावी असे एडवोकेट मंगेश ससाणे यांनी उपस्थितांना सांगितले तर राजाराम पाटील यांनी ओबीसींनी आरक्षित जागेवरील  मूळ ओबीसींना मतदान करावे असे सुचित केले. मृणाल ढोले पाटील यांनी ओबीसींचे आरक्षण खोटे कुणबी दाखले काढून प्रस्थापितांनी कसे गिळंकृत 
केले याची इतंभुत माहिती दिली.
 शहरात ओबीसी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचे सर्वानुमते ठरले...
कार्यक्रमाचे आयोजन कृती समितीचे अध्यक्ष सुरेश गायकवाड पदाधिकारी माऊली बोराटे, वैजनाथ शिरसाट , राहुल मदने, शंकर लोंढे, सुहास कुदळे, लहु अनारसे, सागर बनसोडे, शिवहार काळे, महेश भागवत, राजकुमार परदेशी आधी  कार्यकर्त्यांनी केले. सूत्रसंचालन अजित चौगुले यांनी केले तर आभार माउली बोराटे यांनी मानले.