महारेशीम अभियान चित्ररथ जिल्ह्यात रवाना

बीड, दि,16,(जिमाका) जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयामार्फत आयोजित महारेशीम अभियानाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोकाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष शामसुंदर पडुळे, उपस्थित होते.
यावेळी रेशीम विभागाकडून तयार केलेल्या रथास निवासी उपजिल्हाधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवून रेशिम अभियानाची सुरुवात केली. हे अभियान 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत असून विभागाकडून गावोगावी कार्यक्रमाव्दारे रेशीम शेतीचे महत्व व अल्प पाण्यावर नगदी पीक असल्यने वर्षातुन 4 ते 5 पीके निघत असल्यने तसेच इतर पारंपारिक पिकापेक्षा जास्त उत्पन्न निघत असल्याचे शेतकरी वर्गात जनजागृती करुन करुन नोंदणी करण्यात येते. नोंदणी केलेल्या अल्पभुधारक शेतक-यांना मनरेगा अंतर्गत 4,8,000/- 100 टक्के अनुदान देण्यात येते.
जे लाभार्थी मनरेगा अंतर्गत नाहीत बहूभुधारक यांना विभागाकडून सिल्क समग्र योजने अंतर्गत देण्यात येते.
राज्यात बीड जिल्हा रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे जिल्हयात 5406 शेतकरी यामध्ये काम करत असून रेशीम उत्पादनामुळे उसतोड कामगार म्हणून ओळख असलेल्या या जिल्हयाची ओळख रेशीम उत्पादक जिल्हा म्हणून होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत विभागाकडून शासनमान्य कोष खोली बाजारपेठ उभारणी केली असून यामध्ये मोठया प्रमाणात कोष खरेदी (राज्यात प्रथम क्रमांकावर) केले जात आहे.
सन 2023-24 मध्ये 1109 मेट्रिक टन कोष शेतक-यांनी विक्री केले असून सन 2024- 2025 मध्ये 15 डिसेंबर 24 अखेर 1022 मे. टन कोषाची खरेदी झाली असून सध्या कोषाचे सरासरी दर 550-650 च्या प्रति क्क्टिंल असल्यने शेतक-यांचा कल रेशीम शेतीत वाढत चालला आहे.
यावेळी रेशीम विकास अधिकारी एस.बी. वराट, ए.एम सोनटक्के, एस.आर. राठोड, एस.व्ही बावणे, एस.आर.पाटील, व्ही. एम मस्के, जी. एम शेळके, डी.बी. मिर्झा तसेच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकरी शिवराज काटे, श्री. सपकाळ हे उपस्थित होते. या कालावधीत जास्तीत जास्त शेतक-यांने रेशिम करिता नोंदणी करण्याचे आवाहन रेशीम विकास अधिकारी यांनी केले आहे.