गनिमीकावा युवा सेवा संघात महिलांसाठी भव्य “होम मिनिस्टर” स्पर्धा – पावसातही उसळली गर्दी, प्रत्येक महिलेला गिफ्ट्सचा मान!

 डीजे-मुक्त गणपती विसर्जनाचा अनोखा उपक्रम – “होम मिनिस्टर” कार्यक्रमात महिलांचा जल्लोष, प्रत्येकास गिफ्ट्स!
 गणेशोत्सवात महिलांचा मानाचा सत्कार – गनिमीकावा संघात रंगली “होम मिनिस्टर” स्पर्धा, पैठणीसह पाच बक्षिसं!
 पुणे प्रतिनिधी (उषा लोखंडे) :  गनिमीकावा युवा सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त "होम मिनिस्टर – करूया जागर स्त्रीशक्तीचा आणि खेळ खेळूया पैठणीचा" हा अनोखा, मनोरंजक आणि प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दिनांक २ सप्टेंबर २०२५, मंगळवार रोजी सायं. ६ वाजता झालेल्या या उपक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रस्तावनेचे सूत्रसंचालन आयु सुरेश ओव्हाळ यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध अभिनेत्री मेघनाताई झुझम यांचे यांचे स्वागत गनिमी कावा सेवा संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उत्साहात केले. त्यानंतर  मेघनाताई यांच्या वतीने कार्यक्रमास सुरुवात झाली.

गनिमी कावा युवा सेवा संघटनेचा उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित होम मिनिस्टर या खेळामध्ये महिलांनी हसतखेळत सुंदर सहभाग नोंदविला. विविध फेऱ्यांमध्ये आपली कला, बुद्धिमत्ता आणि विनोदबुद्धी दाखवत स्पर्धकांनी प्रेक्षकांची मने जिंकली.या कार्यक्रमाचे आयोजन गनिमी कावा युवा सेवा संघटना, संस्थापक/अध्यक्ष आयु. पुनम ताई संजय वाघमारे आणि आयु.संजयभाऊ वाघमारे यांनी केले होते.सदरील कार्यक्रम संघटनेच्या मुख्य कार्यालया समोरच्या मोकळ्या जागेत झाला.

 
 कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री मेघना ताई झुझम यांनी केले. त्यांच्या प्रभावी आवाज, सुबोध भाषा आणि आकर्षक शैलीमुळे कार्यक्रमात उपस्थित सर्वांचे लक्ष खिळून राहिले.
 महिलांसाठी खास आखण्यात आलेल्या खेळ, बुद्धिमत्ता,फेऱ्या अशा अनेक प्रश्नोत्तरं आणि रंगतदार स्पर्धांमुळे वातावरण हास्य, आनंद आणि टाळ्यांच्या गजराने भरून गेले. महिलांनी स्वतःची कला, आत्मविश्वास आणि बुद्धिमत्ता मोकळेपणाने मांडली. 

 
 ५ विजेत्या महिला ठरल्या आणि त्यांचा अत्यंत सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
विजेत्यांना दिलेली बक्षिसे –
होम मिनिस्टर स्पर्धा विजेते जाहीर!
विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे:
 
क्रमांक ५वा – सौ. राधिका भडकवाड
 
क्रमांक ४था – आयुष्यमानींनी आम्रपाली गौतम वाघमारे
 
क्रमांक ३रा – आयु. पौर्णिमा गणेश कांबळे
 
क्रमांक २रा – सौ. आरती भडकवाड
 
क्रमांक १ ला(मानाची पैठणी विजेती) – सौ. सविता ढेबे 
 
 गनिमी कावा युवा सेवा संघटनेचा उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित होम मिनिस्टर या खेळामध्ये महिलांनी हसतखेळत सुंदर सहभाग नोंदविला. कार्यक्रम सुरु असताना अचानक पाऊस आला तरीपण भर पावसात विविध फेऱ्यांमध्ये आपली कला, बुद्धिमत्ता आणि विनोदबुद्धी दाखवत स्पर्धकांनी प्रेक्षकांची मने जिंकली.आणि प्रेक्षकही पावसात बसुन मस्त आनंद घेत होते या कार्यक्रमाचे आयोजन गनिमी कावा युवा सेवा संघटना, संस्थापक/अध्यक्ष आयु.संजयभाऊ वाघमारे आणि सौ.पुनमताई वाघमारे यांनी केले होते.सदरील कार्यक्रम संघटनेच्या मुख्य कार्यालया समोर  झाला(अप्पर शेवटचा बसस्टॉपजवळ गजानन बुक डेपो जवळ) घेण्यात आला
सर्व विजेत्या स्पर्धकांचे मनःपूर्वक जल्लोष मध्ये अभिनंदन करण्यात आले. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला
 
प्रत्येक विजेत्या महिला मंचावर येताना प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर आणि आनंदाने भारावून गेल्या. हा सत्कार त्यांच्या चेहऱ्यावर अविस्मरणीय आनंद घेऊन आला.
 याशिवाय सर्व सहभागी महिलांना आलेल्या मान्यवरांच्या हस्ते आकर्षक गिफ्ट्स देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक महिला या कार्यक्रमातून हसऱ्या चेहऱ्याने आणि समाधानाच्या भावनेने घरी परतली.
 
 कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली त्यावेळी गनिमी का संघटनेचे संस्थापक/ अध्यक्ष संजय भाऊ वाघमारे व पूनम ताई वाघमारे यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला. 
 पावसाचा जोरदार सरींचा अडथळा असूनही महिलांसह लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. गर्दी असूनही कार्यक्रम शिस्तबद्ध आणि आनंदी वातावरणात पार पडला.
विशेष म्हणजे, गणपती विसर्जनासाठी डीजेवर होणारा खर्च टाळून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे हा उपक्रम डीजे-मुक्त गणपती विसर्जनाचा आदर्श ठरला.महिलांसाठी हा कार्यक्रम खरंच विशेष ठरला. स्त्रीशक्तीचा जागर आणि सामाजिक बांधिलकी या दोन्ही भावना यामधून प्रकर्षाने जाणवल्या. यावेळी गनिमी कावा संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी अनमोल सहकार्य केले.
 या भव्य उपक्रमाचे श्रेय संघटनेचे अध्यक्ष संजय भाऊ वाघमारे व पूनम ताई वाघमारे यांना जाते. त्यांच्या पुढाकारामुळे व महिलांविषयीच्या संवेदनशीलतेमुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. उपस्थित सर्वांनी संजय भाऊ वाघमारे यांचे मनापासून आभार मानले. 
गणेशोत्सवाचा आनंद, महिलांचा सन्मान आणि सामाजिक जबाबदारी – या तिन्ही गोष्टी साध्य करून हा उपक्रम समाजासमोर एक आदर्श ठरला.