लाखो रुग्णांची नेत्रविकार सेवा घडावी : उपमुख्यमंत्री अजित पवार

लाखो रुग्णांची नेत्रविकार सेवा घडावी : उपमुख्यमंत्री अजित पवार
- डॉ. दुधभाते नेत्रालायचे उदघाटन
 
पुणे, ता. २४ : डोळ्यांमुळे आपण सौंदर्य पाहतो. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात मोतिबिंदूसह डोळ्यांचे इतर आजार होत आहेत. आता उपचारांमध्येही 'ए आय' चा वापर होत आहे. डॉ. अनिल दुधभाते यांनी शून्यातून विश्व निर्माण करत नेत्राची काळजी घेण्यासाठी डोळ्यांच्या सर्वच आजारांवर एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी दहा हजार फुटाचे सुसज्ज सेंटर उभारले आहे, त्यांच्याकडून सर्वसामान्यांची नेत्रसेवा घडावी, अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.

 

 
    माणिकबाग, सिंहगड रस्ता परिसरात आरोग्यसेवेची नवी पर्वणी ठरू शकेल अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त डॉ. दूधभाते नेत्रालय व रेटीना सेंटरचे उद्घाटन अजितदादा पवार यांच्या हस्ते  रविवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी  विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, राष्ट्रवादीचे माजी नेते काका चव्हाण, अनिल गोसावी, पीडिसीसी बँकेचे दिगंबर दुर्गाडे, विकास दांगट, प्रसन्न जगताप, प्रशांत जगताप, अशोक हरणावळ तसेच वैदयकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
 घरची प्रतिकूल परिस्थती असताना डॉ. दुधभाते जिद्दीने शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाल्याबाबत अजित पवार यांनी कौतुक व्यक्त करत पुढे ते म्हणाले, " डॉ. दुधभाते गरिबीतून आल्याने ते गोर गरीब लोकांना सवलतीच्या दरांत सेवा देत आहेत. येथील प्रत्येक नेत्र वैद्यकीय साधनांच्या किमती एक ते पाच कोटींच्या दरम्यान व त्या अमेरिकन बनावटीच्या आहेत. डॉ. दुधभाते नेत्रालाय हे सर्वांना हक्काचे नेत्रालाय झाले आहे. त्याचबरोबर त्यांनी मोफत नेत्रतापसणी करून काम करून सामाजिक भानही जपत डॉक्टरच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम पाहिले आहे. येथे लाखो लोकांचे नेत्रविकार दूर करण्याचे काम हे नेत्रालय करेल, अशा शुभेच्छा दिल्या. 

चेन हॉस्पिटल सुरू करणार : डॉ. दुधभाते
डॉ. दुधभाते म्हणाले, "सन 2011 मध्ये सिंहगड रास्ता परिसरात नेत्रालाय सुरू केले होते. त्यानंतर आता 14 वर्षात स्वतःच्या या भव्य नेत्रालयाच्या वास्तूचे उदघाटन आपल्या सर्वांच्या सहकार्याने करू शकलो. आम्ही येथे अत्याधुनिक सेवा देणार आहोत. खासकरून कांटूरा लॅसिक तंत्रज्ञान येथे आहे. गेली 4 वर्षे आम्ही 500 मोफत नेत्र तापसणीद्वारे 5 लाख लोकांची मोफत नेत्र तपासणी केली. येथेही गरिबाला परवडेल अशा सेवा देणार आहे. कमीत कमी 5 हजार रुपयांमध्ये येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया असून येत्या काळात दुधभाते नेत्रालयाच्या चेन हॉस्पिटल सुरू करण्याची मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते डॉ. दुधभाते यांचे आईवडील धोंडीबा व पार्वती दुधभाते यांचा सत्कार करण्यात आला.-

डॉ. अनिल दूधभाते नेत्रालय व रेटिना सेंटर विषयी : 
 
 प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांनी तीन मजली अद्ययावत उपचार असलेल्या रुग्णालयाची उभारणी केली आहे. डोळ्यांच्या विविध आजारांचे निदान, तपासणी व उपचार एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचे हे केंद्र खास ठरणार आहे. पुणेकरांसह ग्रामीण भागातील रुग्णांनाही येथे उच्च दर्जाची नेत्रसेवा मिळणार आहे. सिंहगड रोड परिसरातील आरोग्यसेवेत भर घालणारे हे रुग्णालय पुणेकरांसाठी एक मोठे वरदान ठरणार आहे.