सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प महाराष्ट्राला नवी दिशा देणारा ठरणार – शत्रुघ्न काटे
पिंपरी :-केंद्रीय अर्थमंत्री डॉ.निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी भारताचा अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प ठरणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये सर्व घटकांचा विचार करत महायुती सरकारने आजचा अर्थसंकल्प गोरगरीब, शेतकरी, महिला, तरुण, तरुणी, व्यावसायिक, मागासवर्गीय घटकांच्या प्रगतीसाठी मांडलेला अर्थसंकल्प होय या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्रला व पिंपरी चिंचवड शहराला नवी दिशा मिळणार आहे असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला.
या अर्थसंकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सर्व सामान्यांच्या १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्तता.
चर्मोद्योग योजनेमुळे 22 लाख नवीन रोजगार निर्माण होणार आहेत, मागासवर्गीय महिलांसाठी विशेष योजना आणल्याने हा समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, कर सवलतीत देखील मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देणारा निर्णय आज केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. देशात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यामुळे आज नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे. समाजातील सर्वच घटकांचे मोठ्या प्रमाणात विकास करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेले असल्याने हा अर्थसंकल्प लोकांच्या प्रगतीला दिशा देणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रात भारतीय भाषांचा विकास आणि आयआयटी संस्था निर्माण होणार असल्याने त्याचबरोबर इंटेलिजन्स वर आधारित संशोधन केंद्रे निर्माण होणार असल्याने वैद्यकीय क्षेत्रात 75000 जागा निर्माण होणार असल्याने रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होणार आहे. शहरी विकासाला 1 लाख कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्याबरोबरच पायाभूत विकासाला राज्यांना व्याजमुक्त निधी मिळाल्याने या क्षेत्रात आता मोठे बदल होतील. ज्येष्ठ नागरिकांनाही आता करामध्ये मोठ्या प्रमाणात सवलत मिळणार आहे.
सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागातील महिलांना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विकासाची संधी देणारा हा अर्थसंकल्प असल्याने केंद्रीय अर्थमंत्री डॉ.निर्मला सीतारमण यांचे व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने विशेष आभार जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे यांनी मानले.