जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजवंदन

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजवंदन

पुणे दि.२६:- भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय तसेच शनिवारवाडा येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. 
यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.