पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी निवेदन

मुंबई (प्रतिनिधी)
माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा बंगाली प्रकोष्ट च्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल मा. सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवनात भेट घेऊन बंगाल मध्ये हिंदुंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. महामहिम राज्यपाल महोदयांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत देशाचे महामहिम राष्ट्रपती महोदया यांना याविषयी निवेदन पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य एस.एस.दास, बंगाली प्रकोष्ट चे संयोजक रंजन चौधरी, नाशिक बंगाली प्रकोष्ट चे जिल्हाध्यक्ष डॉ. घोष व ईतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.